आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या निधीतून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डास हेल्थ एटीएम मशीन भेट
पुणे, दि. 26 – कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आमदार अनंतराव गाडगीळ यांनी त्यांच्या आमदार निधीतून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयास तीन लाख रुपयाचे हेल्थ एटीएम मशीन भेट दिले. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार,पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांचे उपस्थितीत ज्येष्ठ काँग्रेस व सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ चव्हाण यांच्या शुभहस्ते हे हेल्थ एटीएम मशीन भेट देण्यात आले.

या हेल्थ एटीएम मशीनद्वारे एकाच वेळी रक्तदाब,ठोके यासारख्या 23 तपासण्या करता येतात. गेल्या तीन वर्षात माननीय अनंतराव गाडगीळ यांनी त्यांच्या आमदार निधीतून सव्वा कोटीहून अधिक रकमेची वैद्यकीय सामुग्री पुण्यातील विविध सार्वजनिक रुग्णालयास दिली आहे. तसेच फेब्रुवारी 2020 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी कोरोनाच्या उपचाराकरिता दहा लाख रुपयांपेक्षा जास्त निधी खर्च केला आहे.
याप्रसंगी आकाश चव्हाण, मोहन नारायणे,संदीप भोसले, राजेंद्र म्हस्के पाटील,जसपाल सिंग इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
माननीय आमदार अनंतराव गाडगीळ यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये मध्ये सातत्याने केलेल्या आरोग्य कार्यामुळे व नुकत्याच दिलेल्या हेल्थ एटीएम मशीन मुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाला मोठी मदत होत आहे. पालिकेच्या रुग्णालयांना देखील आगामी काळात हेल्थ एटीएम मशीन देण्यात येणार असल्याची माहिती आमदार गाडगीळ यांनी दिली.