राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेल ची आबालवृद्धांसाठी सेवा, 9550 रुग्णांची तपासणी, औषधोपचार  


खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून डॉक्टर सेलचे कौतुक

पुणे : कोरोना विषाणू साथीच्या  तावडीत सापडलेल्या पुणे शहराच्या विविध भागात कंटेन्मेंट क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर्स सेलचे सेवाकार्य आदर्श सेवा कार्य ठरले. सलग आठ दिवस हे १५० धाडसी डॉक्टर रस्त्यावर उतरले आणि ९५५० गोरगरीबांची सेवा केली. या अभियानात महिला डॉक्टरांचाही समावेश होता.

पालिका, प्रशासन यांना मोठी मदत झाली. शंभरहून अधिक संशयित कोरोना रुग्णही पालिकेला शोधून देण्यात आले.

राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेश अध्यक्ष डॉ नरेंद्र काळे, पुणे शहर अध्यक्ष डॉ.सुनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहर राष्ट्रवादी डॉक्टर  सेलच्या सर्व पदाधिकारी आणि पुणे महानगरपालिका यांच्या एकत्रित प्रयत्नातून अतिशय काटेकोर पद्धतीने ‘ डॉक्टर आपल्या दारी ‘अभियाना अंतर्गत पुण्यातील विविध कंटेन्मेंट,रेड झोनप्रमाणे इतरही क्षेत्रात रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार देखील करण्यात आले.एकूण ५ ऍम्ब्युलन्ससह कोव्हीड योद्धा डॉक्टर्स कार्यरत होते.

खा. सुप्रिया सुळे यांच्याकडून डॉक्टर सेलचे कौतुक करण्यात आले आहे. ‘ पुण्यातील कटेंनमेंट भागात छोट्या, मोठया शारीरिक तक्रारींसाठी वैद्यकीय सेवेची गरज लक्षात घेऊन राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलने हाती घेतलेले ‘ डॉक्टर आपल्या दारी ‘हे अभियान महत्वाचे पाऊल होते. डॉक्टरांनी अतिशय धैर्य दाखवून कर्तव्य बजावले. ‘, अशा शब्दात त्यांनी कौतुक केले

या अभियानात डॉक्टरांकडून पीपीई किट,थर्मल गन द्वारे,फेस शिल्ड,सोशल डिस्टन्सिंगचे सर्व निकष पाळले होते. डॉ.सुनिल जगताप यांच्या निर्देशानुसार ठरल्याप्रमाणे शिबिरातून अधिकाधिक रुग्ण वेगळे मनपाच्या डॉक्टरांकडून त्यांची तपशीलवार पुन्हा तपासणी केली जावी या अनुषंगाने पृथक्करण करण्यात आले. विशेषतः वयोवृध्द,डायबेटिक,हायपरटेन्शन,श्वसन विकार इ.कोमॉर्बीडीटी रिस्क जास्त असलेले रुग्ण होते.

Leave a Reply

%d bloggers like this: