fbpx
Thursday, September 28, 2023
PUNE

विनायक नवयुग मित्र मंडळातर्फे २ हजार ५०० गरजू कुटुंबांना मदत

पुणे : कोरोनाच्या सावटामुळे बाधीत झालेल्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील विविध गावांमध्ये कोरोनामुळे अतिशय बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या या लोकांच्या मदतीसाठी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते पुढे आले आहेत. विनायक नवयुग मित्रमंडळ आणि हिंद शक्ती सोशल फाऊंडेशनच्या वतीने तब्बल २ हजार ५०० कुटुंबांना अन्नधान्याचे कीट देण्यात आले आहेत. मदतीचा हा ओघ यापुढेही चालू राहणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
वरुण जकातदार, जयंत कनकुरे, दिनेश अंबुरे,ऋषीकेश आर्य, वर्धमान पुंगलिया, समीर हळंदे, योगेश माळी, प्रसाद शिवदे,योगेश जोगळेकर हे कार्यकर्ते मदतीसाठी विशेष परिश्रम घेत आहेत. येरवडा, वडारवाडी, भोर मधील वेरुळी, पुरंदर मधील कालांदरी, सासवड, काळराई सावळे, लवासा रस्त्यावरील शिळीम आणि भोडे गाव, पुरंदरमधील वेतळवस्ती, खोमणे वस्ती, कान्हे फाटा, तळेगाव, वेल्हे, पुरंदर तालुक्यातील धालेवाडी, नाझरे, कडेपठार, तसेच मुळशी मधील पाठरशेत, अडमल, पडळघर,आंदगवन, भोडे, वेडे सिद्धेश्वर,कटकरवस्ती आदी भागांमध्ये शिधा वाटप करण्यात आले आहे.
सुनील पांडे म्हणाले, कोरोनामुळे समाजातील तळागाळातील नागरिक तसेच हातावर पोट असणाºया कामगार यांची परिस्थिती अतिशय वाईट आहे. या बांधवांच्या मदतीसाठी भांडारकर रस्त्यावरील विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती सोशल फाउंडेशनने पुढाकार घेतला. संस्थेच्या माध्यमातून समाजातील जास्तीत जास्त गरजू बांधवांपर्यंत मदत पोहचविण्यात येत आहे. याशिवाय वाघोली येथील मजुरांच्या वस्तीवर देखील दररोज खिचडीचे वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: