fbpx
Saturday, December 2, 2023
ENTERTAINMENT

अखेर भाईजान पोहचला ‘गॅलेक्सी’वर

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव बळावत असल्याचं लक्षात येताच महाराष्ट्रासह देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. ज्यानंतर सर्वच स्तरांतील नागरिकांना काही प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला. देशभरात कोरोनामुळं उदभवलेल्या या परिस्थितीमुळं कलाविश्वही बेजार झाल्याचं पाहायला मिळालं. इतकं की अनेक कलाकारांना त्यांच्या आप्तजनांपासूनही कित्येक दिवस दूर राहावं लागलं.  अभिनेता सलमान खान हा त्यापैकीच एक. सलमान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर वास्तव्यास आहे. लॉकडाऊनचा संपूर्ण काळ तो तिथे आहे. पण, मंगळवारी मात्र सोशल मीडियावर भाईजानने मुंबईत येत आपल्या आईवडिलांची धावती भेट घेतल्याच्या चर्चांनी जोर धरला आणि साऱ्यांचं लक्ष या चर्चांनी वेधलं. 

सुरक्षा आणि ल़ॉकडाऊनदरम्यान देण्यात आलेल्या नियमांचे सर्व निकष पाळत सलमानने मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास असणाऱ्या त्याच्या आईवडिलांची भेट घेतली.  मुंबई मिरर’च्या वृत्तानुसार अवघ्या काही तासांच्या भेटीनंतरच तो पनवेलला परतला. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आणि रितसर परवानगीसह तो कुटुंबीयांच्या भेटीसाठी आला होता. लॉकडाऊनपूर्वीच्या काही दिवसांमध्ये सलमान, त्याची बहीण अर्पिता, तिचा पती आयुष शर्मा, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस, युलिया वंतूर, भाचा निर्वान आणि इतर काही मंडळींसह सलमान फार्महाऊसवर त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या चर्चेसाठी आला होता असं म्हटलं जातं. पण, लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला गेला आणि पनवेलहून परत निघणं भाईजान आणि त्याच्यासह फार्महाऊसवर असणाऱ्या मंडळींसाठी कठीण होऊन बसलं.  आपण कुटुंबापासून दूर असल्याची माहिती सलमानने एका सोशल मीडिया व्हिडिओतूनही दिली होती. 

Leave a Reply

%d bloggers like this: