fbpx
Monday, October 2, 2023
MAHARASHTRAPUNE

हॉटेल इंडस्ट्री पुन्हा जोमाने उभी राहील

पुणे, ‘कोरोना साथीच्या लॉक डाऊन मुळे हॉटेल इंडस्ट्री प्रतिकूल परिस्थितीतून जात असली तरी ऑन लाईन सेवेमुळे ती पुन्हा कार्यरत होईल आणि लॉक डाऊन उठल्यावर पुन्हा जोम पकडेल’अशी आशा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री मधील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आयोजित वेबिनारला चांगला प्रतिसाद मिळाला. झैद खान (डेमी शेफ,जे.डब्ल्यू.मेरियट,दुबई)आणि अमित खत्री (सेल्स एक्झिक्युटिव्ह,हॉटेल फोर पॉईंट्स शेरेटन) या तज्ज्ञांनी या वेबिनार मध्ये झूम ऍप च्या माध्यमातून सहभाग घेतला.

झैद खान म्हणाले,’कोविड विषाणू साथीमध्ये सर्व हॉटेल इंडस्ट्री मध्ये परदेशात काळजी घेतली जात आहे. दुबई तील हॉटेल चालू असली तरी सुरक्षिततेचे आणि खबरदारीचे सर्व उपाय योजले जात आहेत. दर दोन तासांनी हायजिन तपासले जाते आणि सोशल डिस्टनसिंग पाळले जाते. ग्राहकांना सेवा देताना सर्वोच्च दर्जाची काळजी घेतली जाते.

अमित खत्री म्हणाले,’लॉक डाऊन काळात पुण्यातील पंच तारांकित हॉटेल्स बंद असली तरी फूड डिलीव्हरी एप सेवांशी समन्वय साधून ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न चालू आहे. लौंड्री सेवा पुरविण्यात येत आहे. लॉक डाऊन काळातून हॉटेल इंडस्ट्री तरेल आणि पुन्हा नव्या जोमाने सुरु होईल. हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांनी नाऊमेद न होता अभ्यास सुरु ठेवावा.’ डॉ.अनिता फ्रांझ,विन्सेंट केदारी,इम्रान सय्यद यांनी वेबिनारचे संयोजन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: