Friday, June 19, 2026
PUNE

महा एनजीओ फेडरेशनतर्फे पीएमपी चालकांना हेल्मेट फेस शिल्ड

पुणे : महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने पुण्यातील पीएमपीएमएलच्या चालकांना ५०० हेल्मेट फेस शिल्ड देण्यात आले. चालकांना बस चालविताना सोईचे होतील, अशा पद्धतीचे हेल्मेट फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. त्याचसोबत खाद्यपदार्थांच्या ६ हजार पॅकेटचे देखील वितरण करण्यात आले. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून महा एनजीओ फेडरेशनच्या वतीने विविध सामाजिक कार्य करण्यात येत असून यापुढेही त्यांचे कार्य सुरु राहणार आहे. 
पीएमपीएमएल चे अनंत वाघमारे, कुसाळकर, महा एनजीओ फेडरेशनचे गणेश बाकले, अमोल उंबरजे, शशांक ओंबासे यांनी उपक्रमात सहभाग घेतला. वेगा हेल्मेट कंपनी यांचे उपक्रमाला सहकार्य मिळाले. लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातील २० जिल्ह्यातील दीड लाख पेक्षा अधिक लोकांना मदत करण्यात आली. आर्ट आॅफ लिव्हींगचे प्रणेते व आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांच्या आशीर्वादाने सामाजिक कार्यकर्ते शेखर मुंदडा आणि महा एनजीओ फेडरेनच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली १ हजार ५०० स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते यासाठी काम करीत आहेत.
शेखर मुंदडा म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत गरीब व गरजू लोकांसाठी तसेच आरोग्य, नगरपालिका आणि पोलीस कर्मचा-यांना मदत करण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. याकाळात तब्बल ६० हजार भोजन, २० हजार शिधा संच, २५ हजार खाद्यपदार्थांची पाकिटे, १५ हजार कुटुंबांना आयुर्वेदिक आयुष काढा, २० हजार मास्क, ५ हजार फेस शिल्ड, ६५० पीपीई किट देण्यात आले. पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि चंद्रपूर जिल्ह्यातील आदीवासी भागांचा यामध्ये समावेश आहे. महा एनजीओ फेडरेनने राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यात ५०० रक्तदात्यांनी सहभाग घेतला. याशिवाय ३० वृद्धाश्रमांना मदत, २२ विशेष मुलांच्या संस्थेमध्ये देखील फेडरेशनतर्फे मदत देण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading