Thursday, June 11, 2026
MAHARASHTRA

किर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या प्रवर्तकांवर फसवणूक प्रकरणी सेबीची कारवाई

मार्केट रेग्युलेटरने किर्लोस्कर इंडस्ट्रीजचे अतुल आणि राहुल किर्लोस्कर यांच्यावर एका जुन्या प्रकरणात किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडला तत्कालीन कंपनी केबीएलचा 13.5 टक्के हिस्सा विकल्याचा आरोप लावला आहे. अल्पसंख्याक गुंतवणूकदारांचे नुकसान करून घोटाळा झाल्याचा अतुल आणि राहुल किर्लोस्कर यांच्यावर आरोप केला आहे.

केबीएलचे सहा प्रवर्तक आणि इतर दोन जणांवर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. किर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या अल्पसंख्याक भागधारकांची फसवणूक करून शेअर्स विकले जात आहेत. तसेच, या प्रवर्तकांना केबीएलच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असूनही हा घोटाळा करण्यात आला असल्याचे सेबीच्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

सेबीने म्हटले आहे की, या व्यवहारात मिळवलेला नफा 350 करोड पेक्षा जास्त असून ज्यात विक्री व्यवहार आणि नफ्याच्या मूल्याचा समावेश आहे, असे या व्यवहाराबाबत माहिती असणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले.

6 ऑक्टोबर 2010 रोजी प्रवर्तक गटाने किर्लोस्कर इंडस्ट्रीजला केबीएलचे 10.72 दशलक्ष शेअर्स विकले ज्याची किंमत 275 कोटी रुपये इतकी आहे. सेबीने केबीएलच्या प्रवर्तकांवर आणि इतर दोन जणांवर फसवणूक आणि गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी गौतम कुलकर्णी, राहुल किर्लोस्कर, अतुल किर्लोस्कर, अल्पना किर्लोस्कर, ज्योत्स्ना कुलकर्णी आणि आरती किर्लोस्कर हे थेट विक्रीतील लाभार्थी होते, असा आरोप करण्यात आला आहे.

किर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या पाच पैकी चार संचालकांना केबीएलच्या ढासळणाऱ्या आर्थिक स्थितीची माहिती होती. असे असूनही हे समभाग खरेदी करण्याचा निर्णय कंपनी आणि त्याच्या भागधारकांच्या हिताचा आहे की नाही याची तपासणी करण्याचे संचालकांचे कर्तव्य होते, असेही सेबीने या नोटिसमध्ये नमूद केले आहे. पुढे या संचालकांनी किर्लोस्कर इंडस्ट्रीजला केबीएलचे शेअर्स खरेदी करण्यास उद्युक्त करून सहा वैयक्तिक प्रवर्तकांनी त्यांचे समभाग घेण्यास परवानगी दिली.

नोटिसनुसार, सेबीने किर्लोस्कर इंडस्ट्रीजकडून 2009 आणि 2010 मध्ये शेअर्स खरेदी करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या आर्थिक स्थितीविषयी माहिती होती का याबाबतची कीर्लोस्कर इंडस्ट्रीजकडून माहिती मागविली होती. किर्लोस्कर इंडस्ट्रीजने उत्तर दिले की, त्यावेळी त्यांनी केवळ केबीएलच्या यशाचा आणि नफ्याचा विचार केला.

किर्लोस्कर इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्याने सांगितले : “ आम्ही कोणतीही चुकीची कृत्ये केली नसून त्याबाबतच्या कोणत्याही सूचना मिळाल्या नव्हत्या आणि आमच्यावर लावलेल्या आरोपांचेही खंडन करतो. 2010 मध्ये झालेली शेअर्सची विक्री कायद्यानुसार केली असून स्टॉक एक्सचेंजच्या नियम-अटी अधिनियमांतंर्गत पूर्व-मंजुरीनुसार पूर्ण केली गेली. सेबीच्या सध्या सुरू असलेल्या चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करू आणि यातून आम्ही निश्चितच बाहेर पडू असा आमचा विश्वास आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading