Wednesday, August 26, 2026
BusinessLatest News

‘श्राव्यम द आंध्रा किचन’चे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते झाले उद्घाटन

 

पिंपरी  : आपल्या अस्सल चवींनी खवय्यांची मने जिंकणारे ‘श्राव्यम द आंध्रा किचन’ हे प्रसिद्ध आंध्रा खाद्यपदार्थांचे रेस्टॉरंट चिखली येथे नव्याने सुरू झालेल्या त्यांच्या दुसऱ्या फ्रंचायझीला लाँचच्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शुभप्रसंगी भाजप आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन झाले त्यावेळी अन्य मान्यवर ही उपस्थित होते

‘श्राव्यम द आंध्रा किचन’ला २०२५ मध्ये स्विगी आणि झोमॅटोद्वारे इंदोरमधील पहिल्या क्रमांकाचा बिर्याणी ब्रँड म्हणून सन्मानित करण्यात आले होते, तसेच २०२३ पासून ‘पॉप्युलर साऊथ इंडियन ब्रँड ऑफ इंदोर’ पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.  खमंग चव, दर्जेदार घटक आणि परंपरेत रुजलेला जेवणाचा अनुभव एकत्र आणत श्राव्यम द आंध्रा किचनचे उद्दिष्ट पुणेकरांना आंध्राच्या समृद्ध पाककलेच्या वारशाची अस्सल चव देणे हे आहे. मेनूमध्ये गुंटूर स्पेशल पोडी इडली, टिपू चायना इडली, कढपा स्पेशल कारम डोसा, म्हैसूर बोन्डा, लेमन राईस, हैदराबादी बिर्याणी आणि डबल का मीठा इत्यादी अत्यंत आवडत्या पदार्थांसह आंध्राचे पारंपारिक मसाले आणि पाककृती वापरून तयार केलेल्या अनेक अस्सल शाकाहारी खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

उद्घाटनप्रसंगी मत व्यक्त करताना आमदार  महेश लांडगे म्हणाले, “नवीन व्यवसाय आपल्या खाद्य आणि व्यावसायिक परिसंस्थेच्या वाढीस हातभार लावत त्यांच्या सेवांचा विस्तार करण्यासाठी चिखली आणि पिंपरी-चिंचवडला पहिली पसंती देत आहेत हे पाहणे आनंददायी आहे. पुण्यातील व्यक्तींपर्यंत आंध्राची अस्सल चव पोहोचवत असताना श्राव्यम द आंध्रा किचन आणि त्यांच्या टीमला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा.”

श्राव्यमचे संस्थापक वेंकट राघवेंद्र राव म्हणाले, “आम्ही श्राव्यम द आंध्रा किचन सुरू केले, तेव्हा आम्हाला केवळ आणखी एक रेस्टॉरंट उघडायचे नव्हते. आम्हाला लोकांना अस्सल तेलुगू चव, परंपरा आणि संस्कृतीचा अनुभव घेता येईल असे ठिकाण निर्माण करायचे होते. आम्ही हा नवीन प्रवास सुरू करण्यासाठी आणि आता पुणेकरांच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहोत.”

“पुणे नेहमी नवीन चवी आणि संस्कृती अनुभवण्याची आवड असणारे शहर राहिले आहे. प्रत्येक घासात तिथल्या प्रादेशिक संस्कृतीची झलक दिसेल अशा अस्सल आंध्रा खाद्यसंस्कृतीची पुण्याला ओळख करून देणे हा आमचा एकमेव उद्देश होता.  आमच्या ग्राहकांच्या पाठिंब्याने आम्ही आणखी विस्तार करण्यास उत्सुक आहोत,” असे पुण्यातील फ्रेंचायझी मालक नागेश हनमंत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading