ॲक्सिस लार्ज अँड मिड कॅप फंडने सुरुवातीपासून 17.07% CAGR दिला असून, गुंतवणूकदारांना वाढ आणि स्थिरता यांचा समतोल साधणारा दृष्टिकोन दिला आहे
मुंबई : बाजारातील बदलती परिस्थिती आणि जागतिक स्तरावरील वाढती अनिश्चितता लक्षात घेता, वाढीच्या संधी आणि पोर्टफोलिओची स्थिरता यांचा समतोल साधू शकतील, अशा गुंतवणुकीच्या पर्यायांकडे गुंतवणूकदार वळत आहेत. अशा वेळी लार्ज अँड मिड कॅप फंड्स हा एक महत्त्वपूर्ण पर्याय म्हणून समोर आला आहे; कारण यात प्रस्थापित लार्ज-कॅप कंपन्यांची स्थिरता आणि मिड-कॅप व्यवसायांची वाढीची क्षमता यांचा योग्य मेळ घातला जातो.
ॲक्सिस म्युच्युअल फंडच्या ॲक्सिस लार्ज अँड मिड कॅप फंडने रेग्युलर प्लॅन – ग्रोथ पर्यायांतर्गत, सुरुवातीपासून आतापर्यंत 17.33% इतका सीएजीआर (CAGR – चक्रवाढ वार्षिक वाढीचा दर) दिला आहे (30 जून 2026 रोजीच्या आकडेवारीनुसार). 2018 मध्ये या फंडाच्या सुरुवातीच्या काळात केलेली ₹10,000 ची एकरकमी गुंतवणूक याच कालावधीत वाढून सुमारे ₹33,800 इतकी झाली असती. रेग्युलर प्लॅन – ग्रोथ पर्यायांतर्गत या फंडाने तीन वर्षांच्या कालावधीत 15.08% सीएजीआर आणि एका वर्षाच्या कालावधीत 3.61% परतावा दिला आहे.
फंड मॅनेजरद्वारे व्यवस्थापित केल्या जाणाऱ्या सर्व योजनांची कामगिरी पाहण्यासाठी कृपया येथील लिंकवर क्लिक करा: https://www.axismf.com/1/5/464/627/ALL_Annexure_Jun_2026.pdf
मार्केटमधील सध्याचे वातावरण लार्ज-कॅप आणि मिड-कॅप या दोन्ही विभागांमध्ये संधी उपलब्ध करून देत आहे. अनिश्चिततेच्या काळात लार्ज-कॅप कंपन्या स्थिरता आणि मूल्यांकनाची खात्री देत असल्या तरी, मिड-कॅप कंपन्यांनी कमाईची अधिक मजबूत वाढ दर्शवली आहे, जी भारताच्या दीर्घकालीन विकासाच्या व्यापकतेचे निदर्शक आहे. दोन्ही विभागांमध्ये संतुलित गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना बाजारातील अस्थिरता सांभाळत विकास साधणे सोयीचे होऊ शकते.
या फंडाच्या धोरणात्मक मांडणीवर भाष्य करताना ॲक्सिस म्युच्युअल फंडचे इक्विटी प्रमुख श्रेयश देवाळकर म्हणाले, “वाढता वापर, उत्पादन क्षेत्रावर वाढलेला भर, अर्थव्यवस्थेचे औपचारिकीकरण, खासगी क्षेत्रातील वाढती गुंतवणूक आणि विविध क्षेत्रातील सुधारलेली स्पर्धात्मकता (ज्यामुळे निर्यात वाढू शकते) यासारख्या संरचनात्मक घटकांमुळे भारताचा विकास अविरत सुरू आहे. अशा परिस्थितीत, बाजारातील प्रस्थापित दिग्गज कंपन्या आणि कालांतराने विस्तार करण्याची क्षमता असलेल्या उदयोन्मुख कंपन्या यांचा समावेश असलेल्या पोर्टफोलिओचा गुंतवणूकदारांना फायदा होऊ शकतो, असे आम्हाला वाटते. गुणवत्ता आणि विकासावर विश्वास ठेवणारी संस्था म्हणून, आमचा मुख्य भर अशा कंपन्या शोधण्यावर असतो ज्यांची व्यवसाय मॉडेल्स टिकाऊ आहेत, व्यवस्थापन टीम सक्षम आहे आणि ज्या बाजारातील विविध चढ-उतारांच्या काळातही सातत्यपूर्ण कमाईची वाढ साधण्याची क्षमता ठेवतात.”
या दृष्टिकोनानुसार, ॲक्सिस लार्ज अँड मिड कॅप फंड संशोधन-आधारित गुंतवणूक प्रक्रियेद्वारे दर्जेदार लार्ज-कॅप आणि मिड-कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो, आणि गुणवत्ता तसेच शाश्वत वाढ यांचा मेळ घालणाऱ्या व्यवसायांवर लक्ष केंद्रित करतो. बाजारातील सध्याची परिस्थिती पाहता, आम्ही मूल्यांकनाबाबतही जागरूक आहोत आणि आकर्षक जोखीम-परतावा संधींवर भर देतो. अलीकडच्या काळात, फंडाने उच्च-आत्मविश्वासाच्या संधींमधील वाटप वाढवून आपल्या पोर्टफोलिओची स्थिती अधिक मजबूत केली आहे, ज्यामुळे देशांतर्गत इक्विटीमधील होल्डिंगची संख्या 96 वरून 81 पर्यंत (डिसेंबर 2025 ते जून 2026) कमी झाली आहे. तसेच, ऑटो पार्ट्स, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि औद्योगिक उत्पादने यांसारख्या क्षेत्रांमधील गुंतवणूक वाढवली आहे, आणि त्याचबरोबर उत्पादन-आधारित वाढ, सरकारी धोरणात्मक पाठिंबा आणि पुरवठा साखळीतील विविधीकरणामुळे फायदा होण्याची अपेक्षा असलेल्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे.
जागतिक विस्ताराच्या संधी मिळवण्यासाठी, ज्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या संकल्पनांचा समावेश आहे, या फंडाने धोरणात्मकदृष्ट्या जागतिक बाजारपेठांमधील आपली गुंतवणूक वाढवली आहे, त्याचबरोबर देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठांमधील मूल्यांकनावरही लक्ष ठेवणे सुरू ठेवले आहे.
सर्वसाधारण म्युच्युअल फंड उद्योगात गुंतवणूकदारांचा चांगला सहभाग दिसून येत आहे. मे 2026च्या एएमएफआय (AMFI) आकडेवारीनुसार, भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाची व्यवस्थापनाखालील मालमत्ता ₹81.58 लाख कोटी होती. लार्ज आणि मिड कॅप फंड श्रेणीने अंदाजे ₹3.40 लाख कोटींच्या मालमत्तेचे व्यवस्थापन केले, जो या क्षेत्रातील गुंतवणूकदारांचा सातत्यपूर्ण रस दर्शवतो.
