Tuesday, August 4, 2026
BusinessLatest News

आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड – तिमाहीचे आर्थिक निकाल – एकत्रित महसूल1 वार्षिक आधारावर २९ टक्‍क्‍यांनी वाढून १४,७३१ कोटी रूपये झाला

मुंबई : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडने (“कंपनी”) ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे आपले आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत एकत्रित महसूल1 वार्षिक आधारावर २९ टक्‍क्‍यांनी वाढून १४,७३१ कोटी रूपये झाला. पहिल्या तिमाहीत एकत्रित करोत्तर नफा वार्षिक आधारावर ४० टक्‍क्‍यांनी वाढून १,१७५ कोटी रूपये झाला. ३० जून २०२६ पर्यंत एकूण कर्ज पोर्टफोलिओ (एनबीएफसी आणि एचएफसी) वार्षिक आधारावर ३२ टक्‍क्‍यांनी आणि क्रमाने ६ टक्‍क्‍यांनी वाढून २,१९,२८९ कोटी रूपयांवर पोहोचला. ३० जून २०२६ पर्यंत एकूण एयूएम (एएमसी, जीवन विमा आणि आरोग्य विमा) वार्षिक आधारावर ३६ टक्‍क्‍यांनी वाढून ७,५२,७४५ कोटी रूपये झाली. आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत जीवन विम्याचा वैयक्तिक प्रथम वर्ष प्रीमियम वार्षिक आधारावर २० टक्‍क्‍यांनी वाढून ९५२ कोटी रूपये झाला आणि आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत आरोग्य विम्याचा ग्रॉस रिटन प्रीमियम वार्षिक आधारावर ५० टक्‍क्‍यांनी वाढून २,१९६ कोटी रूपये झाला.

व्यावसायिक कामगिरीची प्रमुख वैशिष्ट्ये:

एनबीएफसी व्यवसाय

  • कर्ज वितरण वार्षिक आधारावर ३४ टक्‍क्‍यांनी वाढून २१,२०१ कोटी रूपये झाले.
  • एयूएम वार्षिक आधारावर २८ टक्‍क्‍यांनी आणि क्रमाने ५ टक्‍क्‍यांनी वाढून १,६७,४५६ कोटी रूपयांवर पोहोचली.
  • करपूर्व नफा वार्षिक आधारावर ३२ टक्‍क्‍यांनी आणि क्रमाने १० टक्‍क्‍यांनी वाढून १,२२२ कोटी रूपये झाला.
  • मालमत्तेवरील परतावा वार्षिक आधारावर १४ बीपीएसने आणि क्रमाने ८ बीपीएसने वाढून २.३९ टक्‍क्‍यांवर पोहोचला.
  • ग्रॉस स्टेज ३ प्रमाण वार्षिक आधारावर ९७ बीपीएसने आणि क्रमाने ३ बीपीएसने सुधारून १.३० टक्‍के झाले.

हाऊसिंग फायनान्स  

  • कर्ज वितरण वार्षिक आधारावर ३९ टक्‍क्‍यांनी वाढून ७,५१५ कोटी रूपये झाले.
  • एयूएम वार्षिक आधारावर ५० टक्‍क्‍यांनी आणि क्रमाने ९ टक्‍क्‍यांनी वाढून ५१,८३३ कोटी रूपयांवर पोहोचली.
  • करपूर्व नफा वार्षिक आधारावर ९५ टक्‍क्‍यांनी आणि क्रमाने १८ टक्‍क्‍यांनी वाढून ३०० कोटी रूपये झाला.
  • मालमत्तेवरील परतावा वार्षिक आधारावर ५३ बीपीएसने आणि क्रमाने ५ बीपीएसने वाढून २.१२ टक्‍क्‍यांवर पोहोचला.
  • ग्रॉस स्टेज ३ प्रमाण वार्षिक आधारावर २२ बीपीएसने आणि क्रमाने ३ बीपीएसने सुधारून ०.४१ टक्‍के झाले.

एएमसी व्यवसाय

  • म्युच्युअल फंडाची तिमाही सरासरी व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर ६ टक्‍क्‍यांनी वाढून ४,२७,६७५ कोटी रूपये झाली.
  • इक्विटी क्यूएएयूएम वार्षिक आधारावर १० टक्‍क्‍यांनी वाढून १,९८,७२२ कोटी रूपये झाली.
  • वैयक्तिक मासिक सरासरी व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर ३ टक्‍क्‍यांनी वाढून २,१०,६०६ कोटी रूपये झाली.
  • करोत्तर नफा वार्षिक आधारावर १२ टक्‍क्‍यांनी वाढून ३०९ कोटी रूपये झाला.

जीवन विमा व्यवसाय

  • वैयक्तिक प्रथम वर्ष प्रीमियम (एफवायपी) वार्षिक आधारावर २० टक्‍क्‍यांनी वाढून ९५२ कोटी रूपये झाला.
  • ग्रुप न्यू बिझनेस प्रीमियम वार्षिक आधारावर ७४ टक्‍क्‍यांनी वाढून १,२८१ कोटी रूपये झाला.
  • रिन्युअल प्रीमियम वार्षिक आधारावर १९ टक्‍क्‍यांनी वाढून २,३४५ कोटी रूपये झाला.
  • नवीन व्यवसायाचे निव्वळ मूल्य (व्हीएनबी) मार्जिन वार्षिक आधारावर ७५६ बीपीएसने वाढून १५.१ टक्‍के झाले.
  • अॅब्सोल्यूट नेट व्हीएनबी वार्षिक आधारावर १५३ टक्‍क्‍यांनी वाढून १६७ कोटी रूपये झाला.

आरोग्य विमा व्यवसाय

  • ग्रॉस रिटन प्रीमियम वार्षिक आधारावर ५० टक्‍क्‍यांनी वाढून २,१९६ कोटी रूपये झाला.
  • स्टँडअलोन आरोग्य विमा कंपन्यांमधील बाजारपेठेतील वाटा वार्षिक आधारावर २०० बीपीएसने वाढून १६.२ टक्‍के झाला.
  • कंबाइंड रेशिओ सुधारून १०६ टक्‍के झाला (आर्थिक वर्ष २०२६ ची पहिली तिमाही: १०७ टक्‍के).

आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत, कंपनीने शेअर्सच्या प्रेफरेन्शियल अलॉटमेंटद्वारे ४,००० कोटी रूपयांचे इक्विटी ग्रोथ कॅपिटल (वाढीव भांडवल) उभारले – ज्यामध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडकडून (प्रवर्तक) २,८८० कोटी रूपये, सूर्याजा इन्व्हेस्टमेंट पीटीई लिमिटेड, सिंगापूरकडून (प्रवर्तक गट संस्था) २०० कोटी रूपये आणि इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनकडून (आयएफसी) ९२० कोटी रूपयांचा समावेश आहे. उभारलेल्या या निधीचा मोठा हिस्सा म्हणजेच ८७.५ टक्‍के निधी हा एनबीएफसी व्यवसायाच्या वाढीची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल आणि १२.५ टक्‍के निधी इतर सामान्य कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी, ज्यामध्ये उपकंपनी/जेव्ही/सहयोगी कंपन्यांमधील गुंतवणुकीचा समावेश आहे, वापरला जाईल.

कंपनीने ग्राहकांना विनासायास डिजिटल प्रणालीत समाविष्ट करणे आणि सेवा वितरण सक्षम करण्यासाठी आपले डिजिटल प्लॅटफॉर्म प्रबळ करणे सुरूच ठेवले आहे. कंपनीचा डी२सी प्लॅटफॉर्म एबीसीडी हा पेमेंट्स, कर्जे, विमा आणि गुंतवणूक यांसारख्या २६ हून अधिक उत्पादने आणि सेवांचा सर्वसमावेशक पोर्टफोलिओ ऑफर करतो. या प्लॅटफॉर्मला जोरदार प्रतिसाद मिळाला असून, ३० जून २०२६ पर्यंत सुमारे १.२ कोटी ग्राहक जोडले गेले आहेत.

एमएसएमई परिसंस्थेसाठीचा सर्वसमावेशक बी२बी प्लॅटफॉर्म उद्योग प्लस व्यावसायिक कर्जे, सप्लाय चेन फायनान्सिंग आणि इतर अनेक मूल्यवर्धित सेवांसाठी विनासायास आणि कागदपत्रविरहित डिजिटल प्रवास प्रदान करतो. २४ लाखांहून अधिक नोंदणींसह यामध्ये मोठी वाढ झाली आहे आणि ३० जून २०२६ पर्यंत याची एयूएम ६,२२९ कोटी रूपयांवर पोहोचली आहे.

कंपनीने आपल्या प्रत्यक्ष शाखांचा विस्तारही सुरू ठेवला असून, ३० जून २०२६ पर्यंत सर्व व्यवसायांमध्ये मिळून संपूर्ण भारतात १,७५९ शाखांची उपस्थिती निर्माण केली आहे. शाखा विस्ताराचे हे उद्दिष्ट टियर ३ आणि टियर ४ शहरांमध्ये आणि नवीन ग्राहक घटकांमध्ये पोहोच वाढवणे हे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading