आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे ‘संतवाणी’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : शास्त्रीय संगीत व संतपरंपरेचा वारसा जपणाऱ्या आर्य संगीत प्रसारक मंडळ, पुणे या संस्थेतर्फे ‘संतवाणी’ या विशेष भक्तिसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता, भरत नाट्य मंदिर, पुणे येथे संपन्न होईल.
संतांच्या अभंगवाणीला स्वरसाज चढवण्यासाठी या कार्यक्रमात चार गायक एकाच मंचावर येत आहेत. विराज जोशी, पं. उपेंद्र भट, सावनी शेंडे आणि पं. श्रीनिवास जोशी हे कलाकार संतवाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध करतील.

कलाकारांना वाद्यसाथसंगत आनंद टाकळकर (टाळ), पांडुरंग पवार (तबला), गंभीर महाराज (पखवाज) आणि माधव लिमये (हार्मोनियम) करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन आनंद देशमुख करतील.
‘संतवाणी’ कार्यक्रमाद्वारे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या निवडक अभंगांचे सादरीकरण होणार असून, भक्तिरसात न्हाऊन निघण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे.
‘संतवाणी’ कार्यक्रमाद्वारे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ यांच्या निवडक अभंगांचे सादरीकरण होणार असून, भक्तिरसात न्हाऊन निघण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे.
या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे, परंतु काही जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तरी पुणे व परिसरातील सर्व संगीतप्रेमी रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून संतवाणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे करण्यात आले आहे.