Wednesday, July 22, 2026
BusinessLatest News

इंडो-एमआयएम लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) 23 जुलै 2026 रोजी होणार सुरु

  • इंडो-एमआयएम लिमिटेड (“कंपनी”) च्या प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 461 रु. ते प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 485 रु. किंमतपट्टा (“इक्विटी शेअर्स”) निश्चित करण्यात आला आहे.
  • प्रमुख गुंतवणूकदार बोली दिनांक – बुधवार, 22 जुलै 2026
  • बोली/ऑफर प्रारंभ दिनांक – गुरुवार, 23 जुलै 2026 आणि बोली/ ऑफर बंद होण्याचा दिनांक – सोमवार, 27 जुलै 2026
  • बोली 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 30 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 30 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

  • 17 जुलै 2026 रोजीची रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“RHP”) ची लिंक –

https://www.hdfc.bank.in/wholesale-banking/investment-banking/offer-documents/indo-mim-limited-red-herring-prospectus

 

20 जुलै 2026: इंडो-एमआयएम लिमिटेड (“कंपनी”) ने गुरुवार, 23 जुलै 2026 रोजी प्रत्येकी 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या आपल्या इक्विटी शेअर्सची प्राथमिक समभाग विक्री (“इक्विटी शेअर्स” आणि त्याची “ऑफर”) खुली करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रमुख गुंतवणूकदारांसाठीच्या बोलीचा दिनांक हा बोली/ऑफर सुरू होण्याच्या दिनांकाच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजे बुधवार, 22 जुलै 2026 आहे. बोली/ऑफर बंद होण्याचा दिनांक सोमवार, 27 जुलै 2026* आहे.

* UPI मँडेटसाठी अंतिम वेळ आणि दिनांक बोली/ऑफर समाप्त होण्याच्या दिनांकाच्या दिवशी सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत असेल.

या प्रस्तावासाठी प्रत्येकी 1 दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी किंमतपट्टा 461 रु. ते प्रत्येकी 1 दर्शनी मूल्य असलेल्या प्रती इक्विटी शेअरसाठी 485 रु. असा निश्चित करण्यात आला आहे. बोली 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या किमान 30 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 1 रु. दर्शनी मूल्य असलेल्या 30 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.

या ऑफरमध्ये एकूण 5,000.00 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू तसेच विक्री करणाऱ्या समभागधारकांकडून 68,291,022 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल  समाविष्ट आहे.

ऑफर फॉर सेलमध्ये ग्रीन मेडोज इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (कॉर्पोरेट प्रवर्तक विक्री समभागधारक) यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण 60,524,322 पर्यंतचे इक्विटी समभाग, अनुराधा कोडुरी (वैयक्तिक प्रवर्तक समूह विक्री समभागधारक) यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण 5,459,000 पर्यंतचे इक्विटी समभाग आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (इतर विक्री समभागधारक) (एकत्रितपणे “विक्री समभागधारक”) यांच्याकडून [●] दशलक्ष रु. पर्यंत एकूण 2,307,700 पर्यंतच्या इक्विटी समभागांचा समावेश आहे.

कंपनीचे इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) (BSE आणि NSE यांना एकत्रितपणे “स्टॉक एक्स्चेंजेस”) येथे सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

एचडीएफसी बँक लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड हे या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading