सीमेन्स ने पुण्यात एक्सक्लुझिव्ह ब्रँड स्टोअर ची केली घोषणा
पुणे : बीएसएच हाऊसगेरेट जीएमबीएच ची उपकंपनी आणि प्रीमियम होम अप्लायन्सेसमधील जागतिक अग्रणी असलेल्या बीएसएच होम अप्लायन्सेस प्रा. लि. ने आज शेरिल एंटरप्रायझेस प्रा.लि. च्या भागीदारीत पुण्यात आपल्या एक्सक्लुझिव्ह सीमेन्स ब्रँड स्टोअर ची घोषणा केली आहे. सोलिटेअर बिझनेस हब-१, बाणेर येथे स्थित, हे नवीन ब्रँड स्टोअर सिमेन्सची ‘इंटेलिजेंट लिव्हिंग’ची संकल्पना पुण्यात आणते. हे एक असे आकर्षक ठिकाण आहे, जिथे अर्थपूर्ण नावीन्य, कनेक्टेड तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक डिझाइन एकत्र येऊन आधुनिक स्वयंपाकघराला एक नवीन ओळख देतात. केवळ एक विक्री केंद्र न राहता, हे स्टोअर घरमालक, वास्तुविशारद आणि डिझाइनर्सना हे अनुभवण्याची संधी देते की, इंटेलिजेंट उपकरणे एकात्मिक परिसंस्थेप्रमाणे एकत्र कशी काम करतात; ती गरजांचा अंदाज घेतात, दैनंदिन कामे सोपी करतात आणि दैनंदिन जीवनाला उन्नत करणारे समृद्ध अनुभव निर्माण करतात.
पुणे हे भारतातील सर्वात प्रगत गृहनिर्माण बाजारांपैकी एक म्हणून उदयास आले आहे. २०२१ ते २०२५ या काळात येथे ४.२८ लाखांहून अधिक घरांची विक्री झाली, जी देशातील सर्वाधिक आहे. आता नवीन घरांपैकी निम्मी घरे ही प्रीमियम आणि लक्झरी सेगमेंटमधील आहेत, जे ग्राहकांच्या बदलत्या आवडीचे दर्शन घडवते. लोक आता मॉड्युलर किचन आणि कनेक्टेड उपकरणांकडे वळत आहेत, ज्यामुळे किचन केवळ स्वयंपाकाची जागा न राहता एक ‘स्मार्ट वातावरण’ बनत आहे.
पुण्यात सीमेन्स च्या कामगिरीतही हे दिसून येत आहे. २०२५ मध्ये कुकिंग श्रेणीने एकूण विक्रीत जवळपास ६० टक्के वाटा उचलला आहे, ज्यामध्ये ओव्हन्सची मागणी निम्म्याहून अधिक आहे. डिशवॉशर्सची मागणीही मोठी आहे, तर २०२६ च्या पहिल्या सहामाहीत कूलिंग उपकरणांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. बीएसएचचे लक्ष्य या वर्षाच्या अखेरीस देशभरात ४० सीमेन्स स्टोअर्स सुरू करण्याचे आहे. भारतात मॉड्युलर किचन आणि इनबिल्ट उपकरणांची बाजारपेठ दरवर्षी २०-२५ टक्के दराने वाढत आहे.
या स्टोअरचे मुख्य आकर्षण सीमेन्स ची स्मार्ट कुकिंग उपकरणे आहेत, जसे की एआय युक्त कॅमेरा ओव्हन, स्टीम ओव्हन्स, आयक्यू ७०० डाऊनड्राफ्ट हूड आणि कनेक्टेड कॉफी मशिन्स. ही उपकरणे अतिशय शांतपणे आणि हुशारीने काम करून दैनंदिन कामे सोपी करतात.
या लाँचबद्दल बोलताना, बीएसएच होम अप्लायन्सेस इंडियाचे एमडी आणि सीईओ, सैफ खान म्हणाले, “पुणे हे भारतातील महत्त्वाच्या प्रीमियम होम अप्लायन्स बाजारांपैकी एक बनत आहे. आम्ही डिशवॉशर्स, फ्रंट लोड वॉशिंग मशीन आणि प्रीमियम कुकिंग श्रेणीमध्ये मोठी वाढ पाहत आहोत, विशेषतः पुण्यातील डिशवॉशर्सची विक्री यावर्षी जवळपास ६५ टक्क्याने वाढली आहे. ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानासोबतच उपकरणांचे डिझाइन आणि कार्यक्षमताही तितकीच महत्त्वाची वाटते. आमच्या या नवीन सीमेन्स स्टोअरद्वारे आम्ही ग्राहकांना हा अनुभव जवळून देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
—
