Wednesday, June 10, 2026
Latest NewsSports

स्पेनमध्ये होणाऱ्या एफआयएम मोटोज्युनिअर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या शर्यतीमध्ये भारतीय रेसिंगपटू सार्थक चव्हाण सहभागी !!

पुणे :  स्पेनमधील ‘बार्सिलोना-कॅटालुन्या‌’ येथे होणाऱ्या ‘एफआयएम मोटोज्युनिअर जागतिक अजिंक्यपद‌’ स्पर्धेचा नवीन हंगाम आज (रविवार, २४ मे रोजी) सुरू होणार असून मौसमाच्या पहिल्या शर्यतीमध्ये भारतीय रेसिंगपडू आणि पुण्यातील सार्थक चव्हाण सहभागी होत आहे. ‘स्टॉक युरोपियन चॅम्पियनशीप‌’ या गटामध्ये सार्थक आपले कौशल्य पणाला लावणार असून ‘क्लिन्ट ज्युनिअर टिम दा कोर्सा‌’ या संघाकडून सार्थक रेसिंग करणार आहे.
नुकत्याच थायलंडमध्ये झालेल्या ‘एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप‌’ (एआरआरसी) स्पर्धेच्या ‘टीव्हीएस रेसिंग इंटरनॅशनल चॅम्पियनशीप‌’ या श्रेणीमध्ये पुण्यातील १९ वर्षीय आणि टिव्हीएस रेसिंग संघाच्या सार्थक चव्हाण याने दुसऱ्या फेरीतील दमदार पुनरागमनासह विजेतेपदाला गवणसी घातली होती. या स्पर्धेत तीन वेळेस विजेतेपद मिळवणारा सार्थक हा एकमेव भारतीय रेसिंगपटू ठरला होता. या यशानंतर सार्थक बार्सिलोनाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दाखल झाला आहे. स्पर्धेतील एकूण ३० रेसिंगपटूंमध्ये सार्थक हा एकमेव भारतीय रेसिंगपटू सहभागी झाला आहे.
स्टॉक युरोपियन चॅम्पियनशीपमध्ये ब्लाई ट्रायस आणि अल्बर्टो गार्सिया या स्पेनच्या अव्वल रायडर्सचे आव्हान सार्थक समोर असणार आहे.
या स्पर्धेची पहिली फेरी स्पेन (२४ मे), दुसरी फेरी पोर्तुगाल (१४ जुन), तिसरी फेरी स्पेन (५ जुलै), चौथी फेरी फ्रान्स्‌ (२६ जुलै), पाचवी फेरी स्पेन (६ ऑगस्ट), सहावी फेरी स्पेन (२७ सप्टेंबर) आणि अंतिम आणि सातवी फेरी इटली (१८ ऑक्टोबर) रोजी होणार आहे.
डीओसी पुणे, लेगसी मोटर्स, केवायटी हेल्मेट्स, एच.ओ.मी., रायनॉक्स आणि प्लॅनेट डी एस जी यांनी पाठिंबा दिला असून सपोर्ट करत आहे. सार्थक याला प्लॅनेट डीएसजीचे हरजीतसिंग मक्कर यांनी पाठींबा दिला असून सपोर्ट करत आहेत.
सार्थक याने वयाच्या चौथ्या वर्षी बाईक चालवायला सुरूवात केली आणि वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मोटोक्रॉस स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास सुरूवात केली. सार्थकला प्रशिक्षक अमोद तळपदे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading