Thursday, May 21, 2026
Latest NewsSports

श्री श्री रविशंकर ॲकॅडमीला विजेतेपद !!

पुणे :  पुणे क्रिकेट ॲकॅडमी आणि सागर कांबळे यांच्यावतीने आयोजित ‘विराट करंडक‌’ आंतरक्लब १२ वर्षाखालील गटाच्या २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत संगमनेरच्या श्री श्री रविशंकर क्रिकेट ॲकॅडमीने ब्रिलीयंट्स क्रिकेट ॲकॅडमीचा ५ गडी राखून पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स क्रिकेट ॲकॅडमीच्या मैदानावर झालेल्या या अंतिम सामन्यामध्ये श्री श्री रविशंकर क्रिकेट ॲकॅडमीच्या हर्षवर्धन नरोडे याची कामगिरी महत्वपूर्ण ठरली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या ब्रिलीयंट्स क्रिकेट ॲकॅडमीने २५ षटकात १२२ धावांचे लक्ष्य उभे केले. श्लोक शेडगे (२८ धावा) आणि स्वर नागवडे (२६ धावा) यांनी संघाचा डाव बांधला. हर्षवर्धन नरोडे आणि स्वराज कुमार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून श्री रविशंकर ॲकॅडमीकडून उत्तम गोलंदाजी केली. हे लक्ष्य श्री श्री रविशंकर क्रिकेट ॲकॅडमीने २१.३ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. निरंजन चौरे (३६ धावा), आरव मेहेर (२४ धावा) आणि श्रावणी चौंधकर (१४ धावा) यांनी महत्वपूर्ण धावा जमवून संघाचा विजय निश्चित केला. ब्रिलीयंट्सच्या अभिज्ञान साळुंखे याने १५ धावांत चार गडी बाद करून अचूक गोलंदाजी केली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक सागर कांबळे आणि प्रमुख पाहूणे योगेश खरात, बालाजी चौधरी, विकास सिंग आणि आकाश सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना करंडक आणि मेडल्स्‌ देण्यात आली.

अंतिम सामन्याचा संक्षिप्त निकालः
ब्रिलीयंट्स क्रिकेट ॲकॅडमीः २५ षटकात ८ गडी बाद १२२ धावा (श्लोक शेडगे २८, स्वर नागवडे २६, हर्षवर्धन नरोडे २-१९, स्वराज कुमार २-२३) पराभूत वि. श्री श्री रविशंकर क्रिकेट ॲकॅडमीः २१.३ षटकात ५ गडी बाद १२६ धावा (निरंजन चौरे ३६, आरव मेहेर २४, श्रावणी चौंधकर १४, अभिज्ञान साळुंखे ४-१५); सामनावीरः हर्षवर्धन नरोडे;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading