Tuesday, October 13, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

”प्रकृतीची चौकशी करण्यासाठी घेतली पवार यांची भेट’; सुनील तटकरे यांचे स्पष्टीकरण

 

 

मुंबई प्रतिनिधी

काल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सुधारित कार्यकारिण जाहीर होताच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा झडू लागल्या. मात्र, आपण केवळ शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांची भेट घेतली असून त्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण तटकरे यांनी दिले आहे.

नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला सुधारित कार्यकारिणीचा नामोल्लेख असलेले पत्र देण्यात आले असून ते समाज माध्यमांवर प्रसिद्ध झाले आहे. या पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्या नावासमोर केवळ राज्यसभा खासदार आणि सुनील तटकरे यांच्या नावासमोर लोकसभा खासदार, एवढाच उल्लेख आहे. त्यांच्याकडे असलेल्या अनुक्रमे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदांचा उल्लेख या पत्रात करण्यात आलेला नाही.

या पत्रावरून राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी पटेल व तटकरे यांना पदावरून दूर ठेवले असल्याची चर्चा रंगली. माध्यमांवर या बातम्या प्रसिद्ध होत असतानाच तटकरे यांनी शरद पवार यांची तातडीने भेट घेतल्याने या चर्चांमध्ये अधिक भर पडली. मात्र, या बाबत तटकरे यांनी ही भेट प्रकृतीच्या चौकशीसाठी असल्याची ग्वाही दिली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading