Saturday, August 29, 2026
Latest NewsPUNE

सह्याद्रि रुग्णालयाची ७५० मायक्रोव्हॅस्क्युलर डिकंप्रेशन शस्त्रक्रियांची दैदिप्यमान कामगिरी

पुणे  सह्याद्रि हॉस्पिटलने वैद्यकीय उपचारामध्ये नवा विक्रम नोंदवला आहे. हॉस्पिटलने गेल्या पाच वर्षांत ७५० हून अधिक मायक्रोव्हस्कुलर डिकंप्रेशन (एमव्हीडी) शस्त्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. मेंदूच्या नसांवर येणा-या दबावामुळे उद्भवणा-या गंभीर व्याधींवर उपचार करण्यासाठी ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया मायक्रोव्हस्कुलर डिकंप्रेशन ही प्रभावी शस्त्रक्रिया मानली जाते. ट्रायजेमिनल न्यूराल्जियाग्लोसोफॅरिजियल न्यूराल्जिया हेमिफेशियल स्पॅझम यांसारख्या आजारांनी त्रस्त असलेल्या शेकडो रुग्णांमा या यशस्वी शस्त्रक्रियांमुळे वेदनामुक्त आयुष्य मिळाले आहे. आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्याने सह्याद्रि हॉस्पिटलने न्यूरोसर्जरी क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे.  

सह्याद्रि हॉस्पिटलच्या न्यूरोसर्जरी पथकाने गेल्या २२ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात तब्बल २ हजार ७०० हून अधिक एमव्हीडी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. हा आकडा पाहता न्यूरोसर्जरी पथकाच्या प्रदीर्घ अनुभवाचा मोठा पुरावा आहे. सह्याद्री हॉस्पिटलचे प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने हे यश संपादन केले आहे. अनेक दशकांचा अनुभव आणि तांत्रिक कौशल्य यांच्या जोरावर या पथकाने मेंदूशी संबंधित गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांमध्ये विशेष नैपुण्य मिळवले असूनशेकडो रुग्णांना वेदनामुक्त आयुष्य देण्यासाठी हे योगदाने महत्त्वपूर्ण ठरले आहे.

सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये संपूर्ण देशभरातून तसेच परदेशातूनही अनेक रुग्णांना उपचारांसाठी येत असतात.

आंतरराष्ट्रीय वैद्यकीय अहवालांनुसारएमव्हीडी शस्त्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीची असल्याने जगातील काही निवड आणि विशेष नैपुण्य प्राप्त केलेल्या केंद्रांमध्येच केली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा शस्त्रक्रियांचे प्रमाण केंद्रागणिक वेगळे असले तरीही यशस्वी कामगिरी आणि अचूकतेने होणारे काम हे केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या ठिकाणीच शक्य असते.

सह्याद्री हॉस्पिटलने नमूद केले आहे कीहॉस्पिटलमध्ये दरवर्षी होणा-या शस्त्रक्रियांचे प्रमाण आंतरराष्ट्रीय स्तरावरील सरासरीच्या तुलनेत लक्षणीयरित्या जास्त आहे. रुग्णाच्या उपचारांबाबतचा प्रत्येक निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घेतला जातो. हा निर्णय वैयक्तिक स्तरावर पक्का केला जातो. रुग्णाची शारिरीक स्थितीआजाराचे स्वरुप यांची सखोल वैद्यकीय तपासणी केली जाते. त्यानंतरच शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जातो.

डॉजयदेव पंचवाघन्यूरोसर्जनसह्याद्री हॉस्पिटल्स यांनी आजारांविषयी माहिती देताना सांगितले की, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया सारख्या व्याधींवर सुरुवातीला औषधांच्या मदतीने उपचार केले जातात परंतु शस्त्रक्रियेच्या उपलब्ध पर्यायांबाबत रुग्ण आणि त्यांना उपचार सूचवणारे डॉक्टर यांच्यामध्ये माहितीचा अभाव असू शकतो. त्यामुळेचवैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार आजाराचे वेगळे निदान होणेरुग्णाबाबत योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणेमाहितीपूर्ण वैद्यकीय निर्णय घेणे महत्त्वाचे ठरते. न्यूरोसर्जरीमधील यश हे रुग्णाची प्रकृतीशस्त्रक्रियेची वेळ आणि उपचारपद्धतींचे काटेकोर पालन अशा विविध बाबींवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णामध्ये उपचारांचे निकाल वेगवेगळे असू शकतात. वेळेवर घेतलेला योग्य निर्णय वेदनामुक्त करण्यात मोलाची भूमिका बजावतो,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

रुग्णालयाच्या वैद्यकीय अनुभवातून अत्याधुनिक न्यूरोसर्जरी उपचारांची परिणामकारकता दर्शवणारी अविस्मरणीय केसेसही उघडकीस आल्या आहेत. एका केसमध्ये मानेच्या वरच्या भागात संवेदनशील आणि महत्त्वाच्या मज्जातंतूच्याजवळ गाठ निर्माण झाली होती. ही शस्त्रक्रिया वैद्यकीयदृष्टया आव्हानात्मक मानली जाते. सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये या रुग्णावरील आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली गेली. रुग्णाच्या प्रकृतीत अनपेक्षित सुधारणा दिसून आलीअल्पावधीतच तो स्वतःच्या पायावर चालू लागला होता. दुसरी केस ही मेंदूत गाठ निर्माण झालेल्या रुग्णाची होती. या रुग्णाच्या मेंदूतील गाठ मोठी आणि आव्हानात्मक होती. या रुग्णावर दंतवैद्य शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णाची विचारशक्तीस्मरणशक्ती आणि हालचालींवर आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या मेंदूच्या कार्यांचे संरक्षण करण्यात डॉक्टरांना यश आले. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या काही आठवड्यांत त्या रुग्णाने आपले दैनंदिन काम सुरु केले. या रुग्णाने स्वतःची सर्जनशीलता अनुभवत सुंदर तेलचित्र तयार केले. रुग्ण हळूहळू बरा होत असल्याचा हा भक्कम पुरावा मिळाला.

७५० हून अधिक शस्त्रक्रिया पूर्ण करत विकसित वैद्यकीय अनुभवांच्या बळावरपुणे शहर आता मेंदू व मज्जासंस्थेच्या आजारांवरील अत्याधुनिक न्यूरोसर्जरी उपचारांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading