Sunday, May 3, 2026
Latest NewsSports

‘कै. सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार’ अंजली भागवत आणि सुंदर अय्यर यांना जाहीर

पुणे   : भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे माजी अध्यक्ष व देशात क्रीडा संस्कृती रुजविणारे माजी रेल्वे राज्यमंत्री व पुण्याचे दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘सुरेश कलमाडी क्रीडारत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आले असून, यंदापासून सुरु करण्यात आलेल्या या पहिल्या पुरस्काराचे आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत आणि लॉन टेनिस संघटक सुंदर अय्यर याचे मानकरी आहेत. २५,००० रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुणे हौशी अॅथलेटिक संघटनेतर्फे हे पुरस्कार दरवर्षी एक खेळाडू व एक क्रीडा संघटक यांना दिले जाणार असून त्याची घोषणा कै. सुरेश कलमाडी यांच्या १ मे या जन्मदिनी दरवर्षी केली जाईल. यंदाच्या पुरस्कार प्रदान समारंभाची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे पुणे हौशी अॅथलेटिक संघटनेचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड यांनी सांगितले.

पुण्यात मॅरेथॉन भवन येथे १ मे या कै. सुरेश कलमाडी यांच्या जन्मदिनानिमित्त झालेल्या खेळाडू व क्रीडा संघटकांच्या बैठकीत प्रथम कै. सुरेश कलमाडी यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी अॅड. अभय छाजेड म्हणाले की “सुरेश कलमाडी हे भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे १९९६ ते २०१२ असे तब्बल १६ वर्ष अध्यक्ष होते. तसेच एशियन अॅथलेटिक्स असोसिएशनचे ते २००० ते २०१३ अध्यक्ष होते. याआधी १९८७ ते २००५ अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष होते. २००८ मध्ये पुण्यात राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा आणि २०१० मध्ये नवी दिल्लीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे त्यांनी भव्यतेने यशस्वी आयोजन केले. याशिवाय पुणे, बँगलोर, मणिपूर, पंजाब, हैदराबाद, गोहत्ती आणि झारखंड येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि २००३ मध्ये अॅफ्रो-एशियन गेम्स यांचे त्यांनी यशस्वी आयोजन केले. देशात पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पुण्यात भव्यतेने त्यांनी सुरु केली. तसेच पुण्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथे श्री. शिवछत्रपती क्रीडानगरी उभारण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. देशात त्यांनी अॅथलेटिक्स क्रीडा संस्कृती रुजवली आणि हजारो तरुण खेळाडू पुढे आणण्यात मोलाचे योगदान दिले. पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर नेणाऱ्या कै. सुरेश कलमाडी यांची स्मृती जागती ठेवण्यासाठी यंदापासून हे पुरस्कार सुरु करण्यात आले आहेत.” असे अॅड. अभय छाजेड म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading