Saturday, August 29, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

BIGG BOSS मराठी सिझन 6 चा फिनाले ठरला रेकॉर्ड ब्रेकिंग!

 

 

मुंबई: कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ ने केवळ प्रेक्षकांची मनेच जिंकली नाहीत, तर रेटिंगच्या शर्यतीतही सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याने ३.१ TVR चा टप्पा गाठत यावर्षीच्या सर्व मराठी रिअ‍ॅलिटी शोचे रेकॉर्ड्स उद्ध्वस्त केले आहेत. या अभूतपूर्व प्रतिसादाने बिग बॉस मराठी पुन्हा एकदा महाराष्ट्राचा नंबर १ रिअ‍ॅलिटी शो ठरला असून, अनमॅच्ड (Unmatched) नंबर्ससह हा या वर्षातील सर्वात मोठा आणि यशस्वी ग्रँड फिनाले ठरला आहे.

या भव्य सोहळ्यात तन्वी कोलतेने आपल्या दमदार आणि सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर ‘महाविजेती’ पदावर मोहोर उमटवली. हा ग्रँड फिनाले केवळ निकालामुळेच नाही, तर स्पर्धकांच्या एका पेक्षा एक धडाकेबाज परफॉर्मन्सेसमुळेही अविस्मरणीय ठरला. अंतिम फेरीतील सदस्यांनी सादर केलेली नृत्ये, रितेश देशमुख यांची अनोखी शैली आणि शंभर दिवसांच्या प्रवासातील आठवणींना दिलेला उजाळा यामुळे प्रेक्षक टीव्ही स्क्रीनला खिळवून राहिले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे या सोहळ्याला एका उत्सवाचे स्वरूप आले होते, ज्याची सांगता तन्वी कोलतेच्या विजयाने आणि जल्लोषाने झाली.

शेवटी, ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ ने पुन्हा एकदा सिद्ध केले की मनोरंजनाच्या बाबतीत या शोची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. ३.१ TVR चे हे ऐतिहासिक रेटिंग प्रेक्षकांच्या अलोट प्रेमाची पावती आहे. तन्वी कोलतेने १५ लाखांची धनराशी आणि मानाची ट्रॉफी पटकावून इतिहास रचला असला, तरी खऱ्या अर्थाने या रेकॉर्ड ब्रेकिंग यशाने कलर्स मराठी वाहिनीने प्राईम टाइमवर आपले वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. भावना, जिद्द आणि चुरस असलेल्या या पर्वाची सांगता एका सोनेरी टप्प्यावर झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading