Friday, May 1, 2026
Latest NewsPUNE

१ मे ते २७ जून दरम्यान महिला व शालेय विद्यार्थ्यांना विनामूल्य बघता येणार शिवसृष्टी

 

पुणे  : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव बुद्रुक येथे उभारण्यात येत असलेली शिवसृष्टी अभय भुतडा फाउंडेशच्या सहकार्यामुळे महिला व १८ वर्षाखालील मुलामुलींसाठी दिनांक १ मे ते २७ जून दरम्यान विनामूल्य पाहता येणार आहे.

याबद्दल माहिती देताना अभय भुतडा, अध्यक्ष, अभय भुतडा फाउंडेशन म्हणाले कि, “शिवसृष्टीच्या माध्यमातून शिवचरित्र घराघरात पोहोचावे यासाठी शिवसृष्टीच्या तिकिटाचे दर कमी व्हावेत किंवा मुलांना हा प्रकल्प सवलतीच्या दरात बघता यावा यासाठी आम्ही फाउंडेशन तर्फे गेल्या वर्षी शिवसृष्टी प्रकल्पाला भरघोस देणगी दिली होती आणि लाखो शिवप्रेमींनी शिवसृष्टीला भेट दिली. गेल्या वर्षीचा प्रतिसाद पाहून यावर्षी देखील आम्ही अभय भुतडा फाउंडेशनतर्फे रुपये ५० लाखांची देणगी दिली आहे. यामुळे जास्तीत जास्त लोकांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शिवसृष्टीला भेट देता येईल आणि १ ते १८ वयोगटातील मुलामुलींना आणि महिलांना विनामूल्य शिवसृष्टी पाहता येईल.”

“सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आम्ही अभय भुतडा फाउंडेशन चे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी दिलेल्या या देणगीमुळे महिला आणि १८वर्षाखालील मुला मुलींना वर नमूद कालावधीत शिवसृष्टी  विनामूल्य पाहता येईल.  पुरुषांसाठी रुपये २०० इतका तिकीट दर असेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून आधी ऑनलाइन स्लॉट बुक करणे गरजेचे आहे. गैरसोय टाळण्यासाठी शिवप्रेमींनी ऑनलाइन बुकिंग केल्याशिवाय शिवसृष्टी पाहण्यासाठी येवू नये कारण ज्यांनी ऑनलाइन बुकिंग केले आहे त्यांनाच आत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावीअसे  महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त जगदीश कदम यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading