Wednesday, April 29, 2026
BusinessLatest News

अमारॉनने ‘बॉस मेकॅनिक’ उपक्रमाद्वारे देशभरातील ५,००० हून अधिक मेकॅनिकांशी साधला थेट संवाद

पुणे : अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटीच्या ऑटोमोटिव्ह बॅटरी ब्रँड अमारॉन® ने ‘बॉस मेकॅनिक’ या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील ५,००० हून अधिक मेकॅनिकांशी संवाद साधत भारतातील ऑटोमोटिव्ह सेवा परिसंस्थेबद्दलची आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर, येत्या हंगामात हा उपक्रम देशभरातील २५,००० मेकॅनिकांपर्यंत विस्तारण्याचा कंपनीचा मानस आहे.

अमारॉनच्या व्यापक मेकॅनिक सहभाग उपक्रमाचा भाग म्हणून आयोजित ‘बॉस मेकॅनिक’च्या पुणे आवृत्तीत चार आठवड्यांच्या ऑनग्राउंड उपक्रमाद्वारे प्रदेशातील १,००० हून अधिक मेकॅनिक सहभागी झाले. वास्तविक वर्कशॉपमधील कामांवर आधारित या कार्यक्रमात सहभागी मेकॅनिकांना त्यांचे तांत्रिक कौशल्य, वेग, सातत्य आणि समस्या सोडवण्याची क्षमता प्रदर्शित करण्याची संधी मिळाली, तसेच उद्योगात त्यांना मान्यता मिळाली. या मोहिमेचा समारोप  फोर पॉइंट्स बाय शेराटन, पुणे नगर रोड, क्लोव्ह पार्क, विमान नगर येथे भव्य अंतिम फेरीने झाला, जिथे सर्व अंतिम फेरीतील स्पर्धकांनी ‘बॅटरी बूस्ट अँड एंड्युरन्स चॅलेंज’ या बहुपातळी स्पर्धेत भाग घेतला, ज्यात तांत्रिक अचूकता, वेग आणि सहनशक्तीची कसोटी पाहण्यात आली.

अंतिम फेरीत नामदेव भीमा प्रभाळे, गुरु कृपा ऑटोमोबाईल, हिंजवडी, पुणे यांनी ‘अमारॉन बॉस मेकॅनिक, पुणे’ हा किताब पटकावत शहरातील सर्वोत्तम मेकॅनिक म्हणून मान मिळवला. विजेत्याला नवीन मोटरसायकल प्रदान करण्यात आली, तर सर्व अंतिम स्पर्धकांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमाणपत्रे आणि अमारॉन-ब्रँडेड स्मृतिचिन्हे देण्यात आली.

या उपक्रमाबाबत बोलताना, चंद्रशेखर राधाकृष्णन, मुख्य व्यवसाय अधिकारी  ऑटोमोटिव्ह आणि होम एनर्जी व्यवसाय (भारत व सार्क), अमारा राजा एनर्जी अँड मोबिलिटी, म्हणाले, “अमारॉनने आपला ब्रँड केवळ उत्पादनांद्वारे नव्हे, तर विशेषतः मेकॅनिक समुदायाशी मजबूत नातेसंबंध निर्माण करून उभा केला आहे. दररोज भारतभरातील वाहनं मेकॅनिकांच्या शांत आणि निष्ठावान परिश्रमांमुळे सुरळीत चालतात आणि आम्हाला वाटतं की उत्कृष्ट काम नेहमीच शांतपणे घडतं. ‘अमारॉन बॉस मेकॅनिक’ या उपक्रमाद्वारे आम्ही ऑटोमोटिव्ह परिसंस्थेला चालना देणाऱ्या कौशल्य आणि विश्वासाचा गौरव करतो. पुण्यातून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला हा उपक्रम आणखी शहरांमध्ये नेण्यासाठी प्रेरणा देतो.”

आपला अनुभव सांगताना, नामदेव भीमा प्रभाळे, गुरु कृपा ऑटोमोबाईल, ‘अमारॉन बॉस मेकॅनिक, पुणे’ विजेते, म्हणाले, “दररोज मेकॅनिक जे काम करतात त्याला ओळख देणारा असा प्लॅटफॉर्म निर्माण केल्याबद्दल मी अमारॉनचे आभार मानतो. आम्ही सहसा पडद्यामागे काम करतो आणि अशा संधीमुळे आमच्या कौशल्याला वाव मिळतो. पुण्यातील इतक्या गुणी मेकॅनिकांसोबत स्पर्धा करून हा किताब जिंकणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.”

या उपक्रमाद्वारे अमारॉनने भारतातील मेकॅनिक परिसंस्थेशी असलेले आपले दृढ नाते अधिक बळकट केले आहे, त्यांना केवळ सेवा पुरवठादार म्हणून नव्हे तर विश्वासार्ह तज्ज्ञ आणि दैनंदिन मोबिलिटीतील महत्त्वाचे घटक म्हणून मान्यता दिली आहे. देशभरातील २५,००० मेकॅनिकांपर्यंत पोहोचण्याच्या विस्तार योजनांसह, हा कार्यक्रम देशातील सर्वात मोठ्या मेकॅनिक सहभाग उपक्रमांपैकी एक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि विविध बाजारपेठांमध्ये अमारॉनचा ग्रासरूट स्तरावरील संपर्क अधिक मजबूत करत आहे. हा उपक्रम त्या सर्वांच्या कार्याचा सन्मान आहे, ज्यांचे काम ब्रँडच्या वचनाप्रमाणे दीर्घकाळ टिकणारे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading