Wednesday, April 29, 2026
BusinessLatest News

एसबीआय लाइफ इन्शुरन्सतर्फे 31 मार्च, 2026 रोजी संपलेल्या वर्षासाठी 42,551 कोटी रु. च्या नवीन व्यवसाय प्रीमियमची नोंद

देशातील अग्रगण्य जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाइफ इन्शुरन्सने 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या वर्षासाठी 42,551 कोटी रु. चा नवीन व्यवसाय प्रीमियम नोंदविला आहे. हेच प्रमाण 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या वर्षात 35,577 कोटी रु. होते. 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या वर्षाच्या तुलनेत सिंगल प्रीमियममध्ये 28% वाढ झाली आहे.

संरक्षणावर स्पष्ट लक्ष केंद्रित करत एसबीआय लाइफचा संरक्षण नवीन व्यवसाय प्रीमियम 31 मार्च 2026 रोजी समाप्त झालेल्या वर्षासाठी 4,622 कोटी रु. वर पोहोचला. यामध्ये 13% वाढ नोंदवली गेली. संरक्षण वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियममध्ये 23% वाढ नोंदवली गेली असून तो 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या वर्षासाठी 973 कोटी रु. वर पोहोचला. वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या वर्षाच्या तुलनेत 13% वाढीसह 29,783 कोटी रु. वर आहे.

 एसबीआय लाइफचा करपश्चात नफा 31 मार्च 2026 रोजी संपलेल्या वर्षासाठी 2,470 कोटी रु. वर असून 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या वर्षाच्या तुलनेत यात 2% वाढ झाली आहे.

कंपनीचा सॉल्व्हेन्सी रेशो 31 मार्च 2026 रोजी 1.90 इतका मजबूत राहिला असून 1.50 या नियामक आवश्यकतेच्या तुलनेत जास्त आहे.

एसबीआय लाइफचा एयूएम देखील 9% वाढीसह 31 मार्च 2026 रोजी 4,87,163 कोटी रु. वर पोहोचला. तो 31 मार्च 2025 रोजी 4,48,039 कोटी रु. होता. त्यामध्ये डेब्ट-इक्विटी प्रमाण 62:38 आहे. डेब्ट गुंतवणुकीपैकी 94% गुंतवणूक AAA आणि सॉव्हरिन साधनांमध्ये आहे.

कंपनीकडे 3,58,506 प्रशिक्षित विमा व्यावसायिकांचे वैविध्यपूर्ण वितरण नेटवर्क असून देशभरात 1,230 कार्यालयांसह कंपनीने व्यापक स्थान निर्माण केले आहे. यामध्ये मजबूत बँकॅश्युरन्स चॅनेल, एजन्सी चॅनेल आणि इतर चॅनेल्सचा समावेश आहे. त्यात कॉर्पोरेट एजंट्स, ब्रोकर्स, पॉइंट ऑफ सेल पर्सन्स (POS), विमा विपणन कंपन्या, वेब अ‍ॅग्रीगेटर्स आणि थेट व्यवसायाचा समावेश आहे.

31 मार्च 2026 रोजी संपलेल्या वर्षातील कामगिरी

  • वैयक्तिक नवीन व्यवसाय प्रीमियम आणि वैयक्तिक रेटेड प्रीमियममध्ये प्रायव्हेट मार्केट लीडरशिपमध्ये अनुक्रमे 25.5% आणि 22.9% बाजार हिस्सा.
  • वार्षिक प्रीमियम समतुल्य (APE) 13% वाढीसह 24,266 कोटी रु. वर
  • वैयक्तिक नवीन व्यवसाय सम अश्योर्ड 61% वाढीसह 4,46,337 कोटी रु. वर
  • 13M आणि 49M पर्सिस्टन्सीमध्ये अनुक्रमे 53 bps आणि 107 bps ने सुधारणा
  • नवीन व्यवसायाचे मूल्य (VoNB) 12% वाढीसह 6,667 कोटी रु. वर
  • VoNB मार्जिन 27.5% आहे
  • इंडियन एम्बेडेड व्हॅल्यू (IEV) 15% वाढीसह 80,791 कोटी रु. वर
  • करपश्चात नफा (PAT) 2% वाढीसह 2,470 कोटी रु. वर
  • एम्बेडेड व्हॅल्यूवरील कामकाज परतावा 19.7% आहे
  • व्यवस्थापनांतर्गत मालमत्ता 9% वाढीसह 4,87,163 कोटी रु. वर
  • 1.90 चा मजबूत सॉल्व्हेन्सी रेशो

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading