Saturday, June 13, 2026
BusinessLatest News

‘एचडीएफसी सिक्युरिटीज’ने ट्रेडर्ससाठी सादर केला ‘एनएक्सटीऑप्शन’ प्लॅटफॉर्म

 

मुंबई : ‘एचडीएफसी सिक्युरिटीज’ने आज ‘एनएक्सटीऑप्शन’ नावाचा नवा आधुनिक प्लॅटफॉर्म सुरू केला. किरकोळ गुंतवणूकदारांना ‘फ्युचर्स अँड ऑप्शन्स’चे (एफ अॅंड ओ) व्यवहार समजून घेण्यासाठी, त्यावर रणनीती तयार करण्यासाठी आणि व्यवहार करण्यासाठी मदत करणारा हा प्लॅटफॉर्म खास तयार करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्ममध्ये विश्लेषण, रणनीती बनवण्याची साधने आणि व्यवहार करण्याची सुविधा या सर्व बाबी एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग (एफ अॅंड ओ) सोपे आणि समजण्यासारखे होईल. भारतात अशा प्रगत ट्रेडिंग साधनांची मागणी वाढत असल्यामुळे हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या नव्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ‘एचडीएफसी सिक्युरिटीज’ने भारतातील गुंतवणुकींना अधिक बळ देण्याचे आपले उद्दिष्ट साधण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. एकत्रित साधने आणि विश्लेषण यांच्या मदतीने गुंतवणूकदारांना शेअर बाजारात अधिक सक्रियपणे सहभागी होण्यासाठी मदत करणे हा यामागचा उद्देश आहे.

‘एचडीएफसी सिक्युरिटीज’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज रेली म्हणाले, “भारतीय बाजारात डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग (एफ अॅंड ओचे व्यवहार) आता मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. मात्र त्याचवेळी या क्षेत्रातील काही उणिवाही स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत. सध्या अनेक व्यवहार हे अंदाजावर आधारित असतात. अनेक गुंतवणूकदारांकडे ठरावीक रणनीती, जोखीम व्यवस्थापनाची चौकट आणि उपयोगी मार्गदर्शन यांचा अभाव असतो. विशेषतः अनेक टप्प्यांच्या रणनीतींमध्ये व्यवहार करताना त्यांच्या अंमलबजावणीत अडचणी येतात, त्यामुळे या गुंतवणूकदारांना अपेक्षित परिणाम मिळत नाहीत. ‘एनएक्सटीऑप्शन’च्या माध्यमातून आम्ही ही दरी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रगत दर्जाचे विश्लेषण आणि सोपी, सुरळीत व्यवहार प्रक्रिया सर्वांसाठी उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश आहे. यामुळे गुंतवणूकदार अधिक शिस्तबद्ध रितीने, ठरावीक रणनीतीनुसार ट्रेडिंग करतील, तसेच वेगवेगळ्या रणनीतींचे व्यवस्थित मूल्यमापन करण्यासाठी त्यांना योग्य साधने मिळतील.”

एनएक्सटीऑप्शन म्हणजे काय?

‘एचडीएफसी सिक्युरिटीज’चा एनएक्सटीऑप्शन हा एक इंटिग्रेटेड ऑप्शन्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. याच्या मदतीने वापरकर्ते ‘एफ अॅंड ओ’ व्यवहारांसाठी बहुआयामी (मल्टी-लेग) रणनीती तयार करू शकतात, तसेच जोखीम आणि संभाव्य नफा समजू शकतात, सहजपणे व्यवहार करू शकतात आणि आपल्या रणनीतींचे रिअल-टाइममध्ये निरीक्षण करू शकतात. सामान्यतः अशा गोष्टींसाठी वेगवेगळी साधने वापरावी लागतात; पण ‘एनएक्सटीऑप्शन’मध्ये हे सगळे एकाच ठिकाणी मिळते.

एचडीएफसी सिक्युरिटीज आता एनएक्सटीऑप्शन का सादर करीत आहे?

भारतामध्ये ‘डेरिव्हेटिव्हज’च्या (एफ अॅंड ओ) बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या झपाट्याने वाढत आहे; पण अजूनही बरेच ट्रेडर्स वेगवेगळे प्लॅटफॉर्म, हाताने केलेली गणिते आणि तुकड्या-तुकड्यांतील पद्धती वापरतात. हेच अंतर भरून काढण्यासाठी एनएक्सटीऑप्शन हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर रणनीतीचे विश्लेषण, जोखीम व्यवस्थापन आणि व्यवहार करणे सोपे व्हावे, हा यामागचा उद्देश आहे. या नव्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ‘एचडीएफसी सिक्युरिटीज’ने भारतातील गुंतवणुकींना अधिक बळ देण्याचे आपले उद्दिष्ट साधण्याचा चांगला प्रयत्न केला असून या नवकल्पनेच्या मदतीने गुंतवणूक अधिक सोपी आणि प्रभावी होणे अपेक्षित आहे.

एनएक्सटीऑप्शनची मुख्य वैशिष्ट्ये :

  1. रणनीती तयार करण्याचे साधन : या सुविधेमुळे तुम्ही ‘एफ अॅंड ओ’मधील व्यवहार करण्याआधी स्ट्रॅडल, स्ट्रॅंगल, आयर्न कंडोर, बटरफ्लाय अशा विविध रणनीती तयार करून पाहू शकता. यात तुम्हाला नफा-तोट्याचे अंदाज, ब्रेक-इव्हन पॉइंट, संभाव्य नफा-तोटा, ग्रीक्स (जोखीम मोजण्याचे मापदंड) आणि लागणारी मार्जिन रक्कम हे सगळे एकाच ठिकाणी दिसते.
  2. रणनीतीवर नजर ठेवणे : यामध्ये तुम्ही संपूर्ण रणनीतीवर एकत्रित नजर ठेवू शकता. म्हणजे प्रत्येक वेगळ्या व्यवहाराकडे पाहण्याऐवजी संपूर्ण रणनीती कशी चालली आहे, हे रिअल-टाइममध्ये समजते.
  3. सोपे पर्याय : बाजारातील भाव वाढतील, घसरतील किंवा स्थिर राहतील याबाबतचे वापरकर्त्यांचे अंदाज लक्षात घेऊन त्यानुसार योग्य ती रणनीती सुचविण्याचे काम हा प्लॅटफॉर्म करतो. तसेच या रणनीतीत किती जोखीम आणि किती संभाव्य फायदा आहे, हेही यात दाखविले जाते. खास करून नव्या किंवा शिकणाऱ्या ट्रेडर्ससाठी हे वैशिष्ट्य उपयोगी आहे.
  4. प्रगत विश्लेषण : यामध्ये डेल्टा, गॅमा, थीटा, व्हेगा, इम्प्लाईड व्होलॅटिलिटी, ओपन इंटरेस्ट यांसारखी महत्त्वाची माहिती रिअल-टाइममध्ये मिळते. तसेच मार्केट मुव्हर्स, रोलओव्हर ट्रेंड्स, आणि ‘एफ अॅंड ओ’ बॅन लिस्ट यांसारखी अतिरिक्त माहितीही यात समाविष्ट आहे.

एनएक्सटीऑप्शन इतर ट्रेडिंग प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळे कसे?

‘एनएक्सटीऑप्शन’ची खासियत म्हणजे या प्लॅटफॉर्मवर एकाच ठिकाणी संपूर्ण प्रक्रिया मिळते. साधारणपणे ट्रेडिंगसाठी वेगवेगळी साधने वापरावी लागतात, पण ‘एनएक्सटीऑप्शन’मध्ये कल्पना → विश्लेषण → व्यवहार हा पूर्ण प्रवास एकाच प्लॅटफॉर्मवर करता येतो. यात मोठ्या संस्थांसारखे प्रगत विश्लेषण आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी सोपी वापरपद्धती या दोन्ही बाबी एकत्र आहेत.

ट्रेडर्सना एनएक्सटीऑप्शन कुठे वापरता येईल?

‘इन्व्हेस्टराईट’ हे मोबाईल अॅप, ‘एचडीएफसी सिक्युरिटीज’चा वेब प्लॅटफॉर्म, तसेच ‘एचडीएफसी स्काय’ हा डिस्काउंट ब्रोकिंग वेब प्लॅटफॉर्म या ठिकाणी ‘एचडीएफसी सिक्युरिटीज’चे एनएक्सटीऑप्शन उपलब्ध आहे.

वापरकर्त्यांना ऑप्शन्सची रणनीती समजून घेता यावी आणि त्यांचे मूल्यमापन करता यावे, यासाठी एनएक्सटीऑप्शनमध्ये इझी ऑप्शन्स हे वैशिष्ट्य देण्यात आले आहे. ट्रेडरचा बाजाराबद्दलचा अंदाज (उदा. बाजार वाढेल, घसरेल किंवा स्थिर राहील) लक्षात घेऊन त्यानुसार योग्य रणनीती यामध्ये सुचवल्या जातात. उदाहरणार्थ, ठराविक कालावधीत निफ्टी उंचावेल असे एखाद्या ट्रेडरला वाटत असेल, तर ‘एनएक्सटीऑप्शन’ची यंत्रणा त्यानुसार ऑप्शन्सची योग्य रणनीती सुचवते आणि त्या रणनीतीमध्ये किती जोखीम आहे व किती फायदा होऊ शकतो, हेही दाखवते.

‘एचडीएफसी सिक्युरिटीज’ने एनएक्सटीऑप्शन सुरू करून भारतातील डेरिव्हेटिव्हजच्या (एफ अॅंड ओ) बाजारात व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी तंत्रज्ञानावर आधारित साधन उपलब्ध करून देण्याची आपली भूमिका अधिक स्पष्ट केली आहे. विश्लेषण, रणनीती तयार करणे आणि व्यवहार करणे, हे सर्व एकाच प्लॅटफॉर्मवर देऊन कंपनीने ट्रेडिंगचा अनुभव अधिक सोपा आणि प्रभावी बनवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे ‘पॉवरिंग इंडियाज इन्व्हेस्टमेंट्स’ हे कंपनीचे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणावर पुढे नेले जात आहे.

‘एनएक्सटीऑप्शन’विषयी अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://investright.onelink.me/Xwlu/viy5q4er

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading