Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्सची ‘मच्छर है, मेहमान नाही’ जनहितार्थ जाहिरात

मुंबई भारतात डास आणि त्यांच्यामुळे पसरणारे आजार अजूनही गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहेत. पणत्यांची उपस्थिती इतकी सामान्य झाली आहे की त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. डासांना निरुपद्रवी पाहुणे मानू नयेया विश्वासातून गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने (जीसीपीएल)ने आपल्या ‘एलिमिनेशन ऑफ मॉस्किटो बोर्न एंडेमिक डिसीज‘ (ईएमबीईडीया सीएसआर उपक्रमांतर्गत ‘मच्छर हैमेहमान नाही’ ही जनहितार्थ जाहिरात सादर केली आहे. या जाहिरातीद्वारे देशभरातील कुटुंबांना डासांना दैनंदिन आयुष्यात किती सहज प्रवेश दिला जातोयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा सीएसआर उपक्रम जीसीपीएलच्या समाजावर सकारात्मक परिणाम घडवण्याच्या ध्येयाशी सुसंगत आहेजो समुदायांमध्ये वास्तविक बदल घडवून आणण्यावर लक्ष केंद्रित करतो.

भारतात दरवर्षी डेंग्यूमलेरिया आणि चिकनगुनिया यांसारखे डासांमुळे होणारे आजार लाखो लोकांना प्रभावित करतात. राष्ट्रीय आरोग्य आकडेवारीनुसार२०२५ मध्ये भारतात डेंग्यूचे १.१३ लाखांहून अधिक रुग्ण  (1.13 lakh dengue cases) आढळले आहेतज्यामुळे पावसाळ्याच्या हंगामापलीकडेही अधिक जागरूकता आणि प्रतिबंधात्मक उपायांची गरज अधोरेखित होते.

भारतातील आदरातिथ्याच्या परंपरेत पाहुण्यांचे आदराने स्वागत केले जाते. याच भावनेला वेगळ्या पद्धतीने मांडत या मोहिमेत ‘मच्छर हैमेहमान नाही’ हा संदेश देण्यात आला आहेप्रत्येक पाहुण्याला घरात आमंत्रण देणे आवश्यक नसते. या जाहिरातीमध्‍ये ‘पधारो म्हारे देश’ या प्रसिद्ध वाक्याला सर्जनशील पद्धतीने ‘ना पधारो म्हारे देश’ असे रूप देण्यात आले आहेज्यातून डासांना घरात कधीही स्वागत नसावेहा संदेश दिला आहे. कूलरमध्ये साचलेले पाणीउघडी बादली किंवा घराभोवती दुर्लक्षित कोपरे यांसारख्या दैनंदिन सवयी कशा डासांच्या वाढीस कारणीभूत ठरतातयाकडेही जाहिरात लक्ष वेधते. डासांना निरुपद्रवी पाहुणे न समजता नको असलेले घुसखोर म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन तयार करून कुटुंबांना साधे प्रतिबंधात्मक उपाय अवलंबण्यास प्रोत्साहित करण्यात आले आहे.

या जाहिरातीबाबत मत व्‍यक्त करत गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडचे एमडी आणि सीईओ सुधीर सीतापती म्हणाले, “डासांमुळे होणारे आजार अजूनही मोठी सार्वजनिक आरोग्य समस्या आहेत. यावर मात करण्यासाठी सामूहिक जागरूकता आणि सातत्यपूर्ण वर्तनात्मक बदल आवश्यक आहेत. ‘मच्छर हैमेहमान नाही’ या मोहिमेद्वारे आम्ही भारतीय कुटुंबांना सहज समजेल असा सांस्कृतिक दृष्टिकोन वापरला आहे. आदरातिथ्याच्या संकल्पनेचा पुनर्विचार करून लोकांनी साधे पण प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय करावेतअशी आमची अपेक्षा आहेज्यामुळे त्यांची घरे आणि समाज अधिक सुरक्षित राहील.

या मोहिमेची संकल्पना मांडणाऱ्या आणि जाहिरात लेखन करणाऱ्या सर्जनशील कथाकार स्वाती भट्टाचार्य म्हणाल्या, “भारतात आदरातिथ्य ही केवळ परंपरा नाहीतर एक सवय आहे. आपण ज्याप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत करतोत्याचप्रमाणे साचलेले पाणी आणि उघड्या कचऱ्याच्या डब्यांच्या माध्यमातून आपण नकळत डासांचेही स्वागत करतोआता या डासांशी असलेले नाते तोडूया आणि त्यांच्यासाठी एक अँटीहॉस्पिटॅलिटी  कवाली गाऊया – मच्छर हैमेहमान नहीं‘.”

या मोहिमेच्या केंद्रस्थानी एक विचारप्रव व्हिडिओ जाहिरात आहेजी प्रभावी कथा सांगण्याच्या शैलीतून आणि सांस्कृतिक प्रतीकांचा वापर करून कुटुंबांना सतर्क राहण्याचे आवाहन करतेआपल्या घरामध्ये आणि घराभोवती डासांची पैदास रोखून प्रत्येक कुटुंबाने जागरूक यजमान बनावेहा यामागचा उद्देश आहे. ‘मच्छर हैमेहमान नहींही मोहीम शाळांमधील उपक्रमसमुदाय स्तरावरील कार्यक्रममहाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणावर भित्तीचित्रेरेडिओवरील कथाकथन आणि ‘अनफ्रेण्‍ड द मॉस्किटो’ या राष्ट्रीय डिजिटल मोहिमेद्वारे राबवली जाणार आहे.

कॅम्‍पेन व्हिडिओसाठी लिंक – https://www.youtube.com/watch?v=4LNO4OP9c_A

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading