Thursday, May 14, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

रूपाली चाकणकर झाल्या फरार: रूपाली पाटील यांचा दावा

 

फेसबुक पोस्टामुळे राज्यभरात मोठी खळबळ

पुणे: प्रतिनिधी

पोलिसांनी जेरबंद केलेल्या भोंदू कॅप्टन अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर फरार झाल्याचा दावा करणारी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुकवर केली आहे. या पोस्टमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

अंक ज्योतिष आणि अध्यात्मिक शक्तीच्या नावाखाली अनेक उच्चपदस्थांना नदी लावणाऱ्या व महिलांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली गजाआड असलेल्या भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या ट्रस्टवर चाकणकर या विश्वस्त आहेत. त्यांनी खरात याच्या डोक्यावर छत्री धरल्याचे छायाचित्र व त्याची पाद्यपूजा केल्याचे चित्रण प्रसिद्ध झाले आहे.

एका वर्तमानपत्राने खरात याच्या विरोधात बातमी प्रसिद्ध केल्यामुळे चाकणकर यांनी त्या वर्तमानत्राच्या संपादकाला धमकावल्याची माहितीही उघड झाली आहे. या प्रकारामुळे चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. त्यांच्या महिला आयोग अध्यक्षपदाच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्या आपल्या अधिकाराचा वापर करून पुरावे नष्ट करण्याची शक्यता व्यक्त करत रूपाली पाटील यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी केली आहे. राजीनामा न दिल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

या पार्श्वभूमीवर चाकणकर फरार झाल्याचा रुपाली पाटील यांच्या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांच्या राजीनाम्याबाबत त्यांच्या पक्षाने निर्णय घ्यावा, अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे तर चाकणकर यांच्या पक्षाचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणात चाकणकर यांची चूक नसल्याचे सांगत त्यांची पाठराखण केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading