Friday, May 15, 2026
Latest NewsPUNE

विमाननगरमध्ये प्रथमच सामूहिक गुढी उभारणीचा सोहळा उत्साहात संपन्न

पुणे : गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘मराठी माझा अभिमान असोसिएशन, विमाननगर’ यांच्या वतीने आयोजित सामूहिक गुढी उभारणीचा सोहळा दत्त मंदिर चौक येथे उत्साहात पार पडला. सकाळी ९ ते ११ या वेळेत झालेल्या या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलिस अधिक्षक विमानतळ पोलिस स्टेशन गोविंद जाधव सर, माजी नगरसेवक अर्जुन जगताप,सामाजिक कार्यकर्त्या मीना काकी सातव,उद्योग पती श्रीराम माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद लाभला.

विशेष म्हणजे, प्रथमच संस्थेतील पुरुष सभासदांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजनात सक्रिय सहभाग घेतला.
पारंपरिक वेशभूषेत गुढी उभारून विधीपूर्वक पूजा करण्यात आली. शंखनादाने वातावरण मंगलमय झाले असून सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे कार्यकारिणी सदस्यांचे नियोजन व समन्वय महत्त्वाचा ठरला. स्नेहा सांडभोर अनिता लोखंडे, रेखा वाबळे, वृषाली मिरजगावकर, मुक्ताताई जगताप, ॲड. नीलिमा चव्हाण आणि अश्विनी देसाई कार्यकारणी सदस्य तसेच संस्थेचे सभासद प्रशांत देशपांडे यांच्या योगदानाने कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला. संस्थेच्या या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले. कार्यकर्मा दरम्यान दरवर्षी हा कार्यक्रम करावा अशी अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली.
अशा प्रकारे मोठ्या थाटामाटात मराठी नववर्षाच्या स्वागताचा सोहळा पार पडला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading