Thursday, June 18, 2026
BusinessLatest News

वारी एनर्जीज लिमिटेडकडून नागपूरमध्‍ये भारतातील सर्वात मोठे १० गिगावॅट एकात्मिक इनगॉट व वेफर उत्‍पादन प्‍लांट उभारण्‍याची घोषणा

: वारी एनर्जीज लिमिटेड या आघाडीच्‍या जागतिक शुद्ध ऊर्जा संक्रमण कंपनीने आज भारताच्‍या ऊर्जा सुरक्षितता व उत्‍पादन स्‍वावलंबीत्वामधील प्रवासामध्‍ये महत्त्वाचा टप्‍पा संपादित केला. कंपनीने नागपूरमधील बुटीबोरी येथे आगामी एकात्मिक सौर इनगॉट आणि वेफर उत्पादन केंद्राचा भूमीपूजन समारंभ उत्साहात पार पडला.

या प्‍लांटमध्‍ये सौर इनगॉट्स व वेफर्ससाठी प्रत्‍येकी १० गिगावॅट क्षमता असेल, ज्‍यासह ते भारतातील सर्वात मोठे एकात्मिक इनगॉट व वेफर उत्‍पादन संकुल असेल. हा प्रकल्‍प भारतातील अपस्‍ट्रीम सौर उत्‍पादन परिसंस्‍था प्रबळ करण्यासह देशातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या सौर क्षेत्रासाठी अधिक स्थिर देशांतर्गत पुरवठा यंत्रणा निर्माण करण्‍याच्‍या दिशेने प्रमुख पाऊल आहे.

३०० एकर जागेवर पसरलेल्या आणि जवळपास ६,२०० कोटी रूपयांच्‍या गुंतवणूकीसह विकसित करण्‍यात येणाऱ्या या प्‍लांटमध्‍ये अत्‍यंत शुद्ध सौर इनगॉट्स व वेफर्सचे उत्‍पादन करण्‍यात येईल, ज्‍यामुळे सौर फोटोवोल्‍टाइक मूल्‍य साखळीचा महत्त्वपूर्ण पाया ठरेल. या अपस्‍ट्रीम कम्‍पोनण्‍ट्समधील देशांतर्गत क्षमता प्रबळ करत हा प्रकल्‍प भारताच्‍या आयातित साहित्‍यावरील अवलंबनाला मोठ्या प्रमाणात कमी करेल, तसेच पुरवठा यंत्रणा स्थिरता वाढवेल आणि स्‍वावलंबी शुद्ध ऊर्जा उत्‍पादनाच्‍या माध्‍यमातून ऊर्जा सुरक्षा संपादित करण्‍याच्‍या देशाच्‍या दीर्घकालीन ध्‍येयाला पाठिंबा देईल.

कार्यसंचालनाला सुरूवात झाल्‍यानंतर हा प्‍लांट ८,००० हून अधिक प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष रोजगार संधी निर्माण करण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यासह महाराष्‍ट्रातील प्रादेशिक आर्थिक विकास, कौशल्‍य निर्मिती व औद्योगिक विकासामध्‍ये योगदान देईल.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रारंभ एका औपचारिक समारंभाने झाला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ सरकारी नेते आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी जी यांनी वारी एनर्जीजच्या नेतृत्वासोबत उपस्थित राहून या ऐतिहासिक प्रकल्पाची सुरूवात झाली.

याप्रसंगी मत व्‍यक्त करत वारी एनर्जीज लिमिटेडचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक हितेश दोशी म्‍हणाले, ”भारताच्‍या शुद्ध ऊर्जा संक्रमणाला नवीकरणीय अवलंबनासह सौर मूल्‍य साखळीमध्‍ये प्रबळ देशांतर्गत उत्‍पादन क्षमता निर्माण करत पाठिंबा मिळेल. नागपूरमध्‍ये आमच्‍या एकात्मिक इनगॉट व वेफर प्‍लांटचे भूमीपूजन भारतातील अपस्‍ट्रीम सौर उत्‍पादन परिसंस्‍थेला प्रबळ करण्याच्‍या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे.

या महत्त्‍वपूर्ण कम्‍पोनण्‍ट्ससाठी मोठ्या प्रमाणात देशांतर्गत क्षमता विकसित करत आमचा भारताच्‍या आत्‍मनिर्भर भारत दृष्टिकोनाप्रती योगदान देण्‍याचा, आयातीवरील अवलंबन कमी करण्‍याचा आणि देशातील सौर पुरवठा यंत्रणेची स्थिरता वाढवण्‍याचा मनसुबा आहे. नागपूरचे धोरणात्‍मक लोकेशन, प्रबळ औद्योगिक परिसंस्‍था आणि भारतभरात कनेक्‍टीव्‍हीटी नागपूरला या मोठ्या स्‍तरीय प्रकल्‍पासाठी योग्‍य गंतव्‍य बनवते. आम्‍ही या महत्त्वपूर्ण उपक्रमाला सक्षम करण्‍यामध्‍ये सतत पाठिंबा देण्‍यासाठी महाराष्‍ट्र सरकारचे आभार व्‍यक्त करतो.

उत्‍पादनाव्‍यतिरिक्त, हा प्रकल्‍प प्रांतामधील स्‍थानिक रोजगार, कौशल्‍य विकास आणि औद्योगिक विकासाप्रती योगदान देईल. भारत विकसित भारत २०४७ दृष्टिकोनाच्‍या दिशेने वाटचाल करत असताना निर्माण करण्‍यात येत असलेल्‍या जा‍गतिक स्‍पर्धात्‍मक शुद्ध ऊर्जा उत्‍पादन पायाभूत सुविधा देशाला नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञानांसाठी जागतिक केंद्र म्‍हणून स्‍थापित करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतील.”

भारत जगातील झपाट्याने विकसित होत नवीकरणीय ऊर्जा बाजारपेठ म्‍हणून उदयास येत आहे, ज्‍याला प्रबळ धोरणात्‍मक उपक्रमांचा पाठिंबा आहे, ज्‍यांचा देशांतर्गत उत्‍पादन क्षमता विस्‍तारित करण्‍याचा आणि ऊर्जा स्‍वावलंबीत्व प्रबळ करण्‍याचा मनसुबा आहे. हा नवीन इनगॉट व वेफर प्‍लांट भारताचा सौर उत्पादन पाया दृढ करण्‍याच्‍या, तसेच देशाच्‍या दीर्घकालीन शुद्ध ऊर्जा महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देण्‍याच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading