Saturday, April 18, 2026
Latest NewsPUNE

गौ आधारित “ब्राउन रिव्होल्यूशन”चा जागतिक शंखनाद – मार्च 2026 मध्ये पुण्यात भव्य जागतिक कामधेनू महोत्सव

पुणे :  गौ आधारित उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “गौ टेक 2026” या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद व प्रदर्शनाचे आयोजन 20 मार्च ते 23 मार्च 2026 या कालावधीतअ‍ॅग्रीकल्चर कॉलेज ग्राउंड, पुणे (महाराष्ट्र)येथे करण्यात येत आहे. हे आयोजन केवळ एक प्रदर्शन नसून गौ आधारित अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून भारताला आत्मनिर्भर आणि सुसंस्कृत बनविण्याच्या दिशेने एक व्यापक राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय अभियान आहे. “गौ टेक 2026” मध्ये देश-विदेशातील धोरणकर्ते, समाजसेवक शास्त्रज्ञ, उद्योगपती, स्टार्ट-अप्स, गुंतवणूकदार, शेतकरी, गौशाळा, विद्यापीठे, संत समाज, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या आयोजनात 300 पेक्षा अधिक स्टॉल्स, 10 हून अधिक विषयाधारित परिसंवाद, विशेष परिषद, B2B बैठका तसेच परदेशी प्रतिनिधींचा सहभाग असणार असून 5 लाखांहून अधिक अभ्यागत येण्याची शक्यता आहे.

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, स्टार्ट-अप इंडिया आणि व्होकल फॉर लोकल या दृष्टीकोनातून प्रेरणा घेऊन, आंतरराष्ट्रीय संस्था ग्लोबल कन्फेडरेशन ऑफ काउ-बेस्ड इंडस्ट्रीज (GCCI) यांच्या वतीने, महाराष्ट्र गौ सेवा आयोग आणि आर.आर. केबल यांच्या सहकार्याने आयोजित “गौ टेक 2026” आज केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर गौ-आधारित उद्योगांसाठीचे सर्वात मोठे व प्रभावी व्यासपीठ म्हणून उदयास येत आहे. हे आयोजन भारतीय संस्कृती, परंपरा, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा सशक्त संगम असून, “ब्राऊन रिव्होल्यूशन (Brown Revolution)”च्या माध्यमातून सात्त्विक विकासाच्या दिशेने भारताला पुढे नेण्याचे कार्य करणार आहे.

GCCI चे संस्थापक, माजी केंद्रीय मंत्री तसेच राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथीरिया यांनी सांगितले की, भारतीय सभ्यतेत गौमातेला कामधेनूचे स्वरूप मानले जाते. गायीकडून मिळणारे दूध, गौमूत्र, शेण व पंचगव्य यांना धार्मिक किंवा सांस्कृतिक महत्त्व तर आहेच; परंतु त्यामध्ये आरोग्य, शेती, ऊर्जा, पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला सक्षम करण्याची अद्भुत वैज्ञानिक व आर्थिक क्षमता दडलेली आहे. “गौ टेक 2026” या सर्व शक्यता एकाच व्यासपीठावर आणून युवक, महिला, गौशाळा, स्टार्ट-अप्स, गुंतवणूकदार, उद्योगपती आणि धोरणकर्त्यांमध्ये संवाद, सहकार्य आणि नवोन्मेषाचे वातावरण निर्माण करेल.

गौ टेक 2026 च्या आयोजनासाठी पुण्याची निवड यासाठी करण्यात आली आहे की, पुणे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख शैक्षणिक, संशोधन व नवोन्मेष केंद्र आहे. पुणे व परिसरात अनेक नामांकित कृषी व पशुपालन विद्यापीठे, संशोधन संस्था, तंत्रज्ञानाधारित स्टार्ट-अप्स, प्रगतशील शेतकरी समूह तसेच सक्रिय गौशाळा कार्यरत आहेत. नैसर्गिक शेती, गौ आधारित उद्योजकता, दुग्ध विकास आणि कृषी-तंत्रज्ञान क्षेत्रातील पुण्याची सशक्त परिसंस्था या आयोजनाच्या उद्दिष्टांना पूर्णतः अनुरूप आहे. तसेच पुण्याचे धोरणात्मक भौगोलिक स्थान, उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, आधुनिक पायाभूत सुविधा आणि राज्य व राष्ट्रीय स्तरावरील संस्थांची उपस्थिती “गौ टेक 2026” ला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देईल.

सध्याच्या काळात गायींच्या संवर्धनात तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्कृष्ट सांड विकास, सेक्स्ड सीमेन तंत्रज्ञान, एम्ब्रियो ट्रान्सप्लांट, सीमेन लॅबोरेटरीची स्थापना अशा क्षेत्रांत सरकारच्या सहकार्याने PPP मॉडेलवर व्यवसाय सुरू झाले आहेत. भारतीय देशी गायींच्या A-2 दुधापासून तयार होणारे लोणी, तूप, ताक तसेच औषधी तुपासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विकसित झाली आहे. गौमूत्र व शेणापासून जैविक शेतीसाठी बायोपेस्टिसाइड, बायोफर्टिलायझर, विविध औषधे, पर्यावरण शुद्धीसाठी रिपेलंट व सॅनिटायझर तसेच घरगुती वापरासाठी विविध सौंदर्यप्रसाधने तयार होत असून महिलां व युवकांसाठी रोजगार व उद्योजकतेच्या संधी निर्माण झाल्या आहेत. शेणापासून गोबर पेंट, प्लास्टर, रंग, विटा, प्लायवुड, टाईल्स, कागद तसेच स्मशानासाठी लाकडाचा पर्याय म्हणून गोबर लाकूड अशा उत्पादनांचा मोठा बाजार विकसित झाला आहे. याशिवाय शेण व गौमूत्रापासून बायोगॅस, CNG, CO₂ तसेच हायड्रोजनसारख्या बायो-फ्युएलचे उत्पादन करून विविध कारखान्यांना पुरवठा करण्यात येत आहे.

“गौ टेक 2026”मध्ये सेंद्रिय खत व बायो-फर्टिलायझर्स, दूध व दूधापासून तयार होणारे मूल्यवर्धित उत्पादने, गौमूत्र व गोबरावर आधारित उत्पादने, नैसर्गिक शेती, पशुवैद्यकीय महाविद्यालये व विद्यापीठे, सीमेन प्रयोगशाळा, सेक्स-सॉर्टेड सीमेन व एम्ब्रियो ट्रान्सफर तंत्रज्ञान, सौर व बायो-एनर्जी, चारा व बियाणे उद्योग, चारागाह विकास यंत्रसामग्री, शासकीय व खासगी बँका, सहकारी संस्था, दुग्ध संघ व फेडरेशन, विविध राज्यांचे गौ सेवा आयोग, अ‍ॅनिमल फूड प्रोसेसिंग युनिट्स, इनोव्हेटिव स्टार्ट-अप्स, संशोधन व विकासावर आधारित गौ-उत्पादने, भारतीय देशी गौ-नस्लांचे लाईव्ह प्रदर्शन तसेच नॅचरोपथी, आयुर्वेद व पंचगव्य आधारित उपचार पद्धतींशी संबंधित सर्व श्रेणींचे स्टॉल आधीच पूर्णतः बुक झालेले आहेत, जे या आयोजनाला देश-विदेशातून मिळणाऱ्या व्यापक उत्साह व विश्वासाचे स्पष्ट द्योतक आहे.

गौ टेक 2026 चे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष श्री शेखर मुदडा यांनी सांगितले की, “गौ टेक 2026” माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या मार्गात “मेक इन इंडिया” आणि “व्होकल फॉर लोकल” या मोहिमांना बळकटी देईल. गौशाळा व पंजरापोळीत उपलब्ध असलेले गौवंशातून मिळणारे गौमूत्र व शेण हे सहज उपलब्ध कच्चे साहित्य असून त्याचा विविध उद्योगांमध्ये उपयोग करता येऊ शकतो. ही पहल क्लीन इंडिया, हेल्दी इंडिया, ग्रीन इंडिया, डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया या दृष्टिकोनांना अधिक सशक्त करेल.

या महाआयोजनाअंतर्गत कुलगुरू संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून देशातील विद्यापीठांमध्ये “कामधेनू चेअर” स्थापन करण्याचा उद्देश आहे, ज्यामुळे गौ आधारित शिक्षण, संशोधन व नवोन्मेषाला शैक्षणिक स्तरावर संस्थात्मक स्वरूप मिळेल. याशिवाय महिला संमेलनाद्वारे गौ आधारित महिला उद्योजकता, स्वरोजगार व आत्मनिर्भरतेला चालना देण्यात येईल, तर संत संमेलनाद्वारे गौ महात्म्य, अध्यात्मिकता व सांस्कृतिक मूल्यांवर व्यापक चर्चा होईल. पंचगव्य चिकित्सा संमेलन आयोजित करण्यात येणार असून देशभरातील पंचगव्य चिकित्सक, आयुर्वेदाचार्य, निसर्गोपचार तज्ज्ञ व संशोधक सहभागी होतील. या संमेलनात पंचगव्य आधारित उपचार पद्धती, रोग निवारण, प्रतिकारशक्ती वाढविणे तसेच वैज्ञानिक संशोधनाचे अनुभव मांडले जातील. यासोबतच व्यापक गौशाळा संमेलनही आयोजित करण्यात येणार असून देशभरातील गौशाळांचे प्रतिनिधी, व्यवस्थापक व गौसेवक गौशाळा व्यवस्थापन, आर्थिक आत्मनिर्भरता, तांत्रिक उन्नयन व शासकीय योजनांवर विचारमंथन करतील.

गौ टेक 2026 चे भव्य उद्घाटन समारंभ 20 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात येणार असून देश-विदेशातील मान्यवरांची उपस्थिती राहील. या समारंभातून चार दिवसीय आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषदांचे औपचारिक उद्घाटन होईल. तसेच 23 मार्च 2026 रोजी समारोप समारंभ आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये गौ टेक 2026 च्या उपलब्धी, करार, गुंतवणूक प्रस्ताव व भावी कार्ययोजनेची घोषणा केली जाईल. हा समारोप समारंभ गौ आधारित चळवळीला पुढे नेण्याच्या नव्या प्रतिबद्धतेचे प्रतीक ठरेल.

“गौ टेक 2026” परिसरात गौ परिक्रमा मार्ग व मॉडेल गौशाळा युनिटची उभारणी करण्यात येणार असून येथे भारतीय देशी गायींचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्यात येईल. याच परिसरात वैदिक परंपरेनुसार अग्निहोत्र गौ यज्ञाचे आयोजनही प्रस्तावित आहे. आयोजनाच्या पूर्वतयारीअंतर्गत 15 मार्च 2026, रविवाररोजी भव्य भूमिपूजन समारंभ आयोजित करण्यात येणार असून तो या ऐतिहासिक आयोजनाचा आध्यात्मिक व सांस्कृतिक शुभारंभ ठरेल.

गौ टेक 2026 अंतर्गत आयोजित होणाऱ्या परिसंवादांमध्ये गौ पर्यटन, गौ आरोग्य, गौ आयुर्वेद, गौ उत्पादन प्रक्रिया, पंचगव्य उत्पादने, गौ ऊर्जा व बायो-फ्युएल, गौ ग्राम मॉडेल, कामधेनू नगर, गौ वसतिगृह तसेच गौ उद्योजकता प्रशिक्षण अशा विषयांवर सखोल चर्चा केली जाईल. या परिसंवादांद्वारे धोरण, गुंतवणूक, नवोन्मेष व प्रत्यक्ष अंमलबजावणी यांना जोडत गौ आधारित अर्थव्यवस्थेला सशक्त व व्यावहारिक स्वरूप देण्यात येईल.

या आयोजनात आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींच्या सहभागासह B2B बैठका, स्टार्ट-अप फंडिंग, CSR व इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंटसंदर्भातील विशेष सत्रांचे आयोजन करण्यात येणार असून गौ आधारित उद्योगांना जागतिक गुंतवणूक व बाजारपेठेशी जोडले जाईल. “गौ टेक 2026” हे केवळ प्रदर्शन न राहता गुंतवणूक, नवोन्मेष व धोरण संवादाचे सशक्त व्यासपीठ ठरेल.

“गौ टेक 2026” ला महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे विशेष सहकार्य लाभले असून भारत सरकारच्या MSME मंत्रालयाकडून या प्रदर्शनास सहभागासाठी मान्यता देण्यात आली आहे, ज्यामुळे MSME अंतर्गत सहभागी होणाऱ्या उद्योजकांना अनुदानाचा लाभ मिळू शकणार आहे.

या ऐतिहासिक आयोजनास परम पूज्य संतश्री स्वामी चेतनानंद महाराज, रांका ज्वेलर्स, पुणे मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स यांच्यासह अनेक उद्योग समूह, सामाजिक संस्था व प्रतिष्ठित व्यक्तींचे सक्रिय समर्थन लाभत आहे. गौ टेक 2026 संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत GCCI चे पदाधिकारी, महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे प्रतिनिधी, उद्योगपती, शास्त्रज्ञ, संतगण तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

गौ टेक 2026 चे यशस्वी, सुव्यवस्थित व ऐतिहासिक आयोजन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ऑर्गनायझिंग कमिटी, कोअर कमिटी, अ‍ॅकॉमोडेशन कमिटी, सेमिनार कमिटी, कल्चरल कमिटी, व्हीआयपी गेस्ट कमिटी, प्रेस-मीडिया कमिटी, सोशल मीडिया कमिटी, आयटी कमिटी, फंड रेजिंग कमिटी, महिला सशक्तीकरण कमिटी, अवॉर्ड्स व मेमेंटो कमिटी, एनआरआय व फॉरेन इन्व्हेस्टर्स कमिटी, साधू-संत कमिटी तसेच गौशाळा कमिटीतील सर्व पदाधिकारी व सदस्य पूर्ण समर्पण, सेवाभाव व टीमभावनेने कार्यरत आहेत. प्रत्येक समितीने आपापली जबाबदारी गांभीर्याने स्वीकारून दिवस-रात्र परिश्रम करत नियोजन, समन्वय, अंमलबजावणी व अतिथी सुविधांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सर्व समित्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे गौ टेक 2026 हे आदर्श, प्रेरणादायी व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशस्वी आयोजन ठरण्याच्या दिशेने ठोस प्रगती करत असून, हे निश्चितच गौ आधारित अर्थव्यवस्था, संस्कृती व नवोन्मेषाला नवी उंची देईल.

या कार्यक्रमादरम्यान गौ उद्योजकता आणि गौसेवा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी २० हून अधिक विविध श्रेणींमध्ये “गौ टेक पुरस्कार” प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच, गोबर आणि गोमूत्रावर आधारित व्यावसायिक तसेच दैनंदिन वापरातील उत्पादने तयार करण्याचे थेट (लाईव्ह) प्रशिक्षण दिले जाणार असून, यामुळे स्वयं-सहायता गट, महिला, युवक तसेच गौशाळा संचालकांना आत्मनिर्भरतेच्या दिशेने सक्षम करण्यात येईल.

गौ टेक 2026 ला मार्गदर्शन देण्यासाठी चीफ पॅट्रन म्हणून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित शास्त्रज्ञ विजय भटकर, भारत सरकारचे माजी मंत्री प्रकाश जावडेकर, गुजरात सरकारचे माजी मंत्री भूपेन्द्र चुडासमा तसेच IFFCO चे चेअरमन दिलीपभाई संघानी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

चार दिवसीय आयोजनादरम्यान महाराष्ट्र व गुजरात राज्यांचे राज्यपाल आचार्य देवव्रतजी, भारत सरकार तसेच महाराष्ट्र व गुजरात सरकारचे मंत्री, खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी व अनेक उच्चस्तरीय शिष्टमंडळे आयोजनस्थळी भेट देणार आहेत.

समाजातील सर्व स्तरांतील घटकांना—उद्योगजगत, व्यापारी संस्था, सहकारी संघटना, सामाजिक संस्था तसेच गौसेवेशी संबंधित दानशूर व्यक्तींना—“गौ टेक 2026”साठी प्रायोजन (Sponsorship) व सहकार्य करण्याचे हार्दिक आवाहन करण्यात येत आहे. गौ-आधारित विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष, स्टार्ट-अप्स, महिला व युवक उद्योजकता तसेच पर्यावरण संरक्षणाला समर्पित असे हे राष्ट्रीय स्तरावरील आयोजन समाजहित व राष्ट्रहित या उद्देशाने आयोजित करण्यात येत आहे. समाजाकडून मिळणारे हे सहकार्य केवळ या आयोजनाला बळकटी देणार नाही, तर आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला साकार रूप देणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती देणे आणि भारतीय गौ-आधारित पारंपरिक ज्ञानाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणे यामध्येही निर्णायक भूमिका बजावणार आहे.

GCCI चे जनरल सेक्रेटरी श्री अमिताभ भटनागर यांनी सांगितले की, गौ टेकच्या वतीने सर्व गौप्रेमी, गौ आधारित स्टार्ट-अप्स, महिला उद्योजक, सेंद्रिय शेतकरी, गौशाळा, संशोधक व तांत्रिक नवप्रवर्तकांना “गौ टेक 2026” मध्ये स्टॉल बुक करून आपली उत्पादने, सेवा व संकल्पना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्टॉल बुकिंग सुरू झाली असून इच्छुकांनीमोबाईल : 93419 28011, 79874 41471, 83201 77647 किंवाई-मेल : info@gautechexpo.in वर संपर्क साधावा.

“गौ टेक 2026” उच्च दर्जाचे, सुव्यवस्थित व संस्मरणीय व्हावे या उद्देशाने इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी म्हणून Toredo Fairs India Pvt. Ltd. ची नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेचे श्री मनीष चतुर्वेदी हे गौ टेकच्या दृष्टिकोनाशी व गौ आधारित चळवळीशी पूर्णतः जोडलेले आहेत. प्रदर्शन आयोजनापासून आंतरराष्ट्रीय मानकांनुसार स्टॉल डिझाइन, सहभागी समन्वय तसेच संपूर्ण कार्यक्रमाच्या सुरळीत अंमलबजावणीपर्यंत Toredo Fairs India Pvt. Ltd. ची अनुभवी टीम “गौ टेक 2026” ला प्रभावी, व्यावसायिक व यशस्वी महोत्सव बनविण्यासाठी पूर्ण निष्ठेने कार्यरत आहे.

“गौ टेक 2026”यशस्वी करण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम, दूरदृष्टी आणि समर्पित टीमवर्कचे दर्शन घडविणाऱ्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये GCCI चे संस्थापक डॉ. वल्लभभाई कथीरिया यांच्या मार्गदर्शनाखाली, गौ टेक 2026 चे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष श्री शेखर मुदडा, GCCI चे जनरल सेक्रेटरी मित्तल खेतानी, रमेशभाई घेटीया, हंसराजभाई गजेरा, अमिताभ भट्टनागर, पुरीशकुमार, समस्त महाजनचे गिरीश शाह, महाराष्ट्र गौ सेवा आयोगाचे सदस्य डॉ. नितिन मार्कंडेय, श्री संजय भोसले, श्री उद्धव नेरकर, डॉ. सुनील सूर्यवंशी, सनत कुमार गुप्ता, दीपक भगत, श्री मनिष वर्मा, श्री परेश शाह तसेच GCCI महाराष्ट्र टीममधील डॉ. दिलीप कुलकर्णी, मंगल अकोले, महेश लुहार, विनायक बोरोलें पाटील, कौस्तुभ देशपांडे, मल्हार चणीयारा, रमेश ओसवाल, भाग्यश्री चौंडे, अश्विनी पाटील, डॉ. देशमुख, राजेंद्र चौहाण, दिलीप काले, सुरेश धर्मावत, मगराज राठी आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading