Saturday, April 4, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

किरीट सोमैयांचे ‘अतिरेकी आरोपांवर’ नाशिक पोलीस अधिक्षक व जिल्हाधिकारी यांनी खुलासा करावा…! काँग्रेसची मागणी ..

पुणे :  माजी खासदार व भाजपचे वादग्रस्त नेते किरीट सोमैया हे मालेगांव (जि. नाशिक ) येथे जाऊन माध्यमांसमोर ‘बांगला देशी अतिरेकीं’ बद्दल संख्येसह नेमकी माहिती देत आहेत व प्रक्षोभक वक्तव्ये करत असल्याचे समोर येत आहे, हा प्रकार गंभीर असल्याने नाशिक  जिल्हा पोलीस व प्रशासनाने या गंभीर आरोपांबाबत तातडीने खुलासा करावा व कारवाई बाबत माहिती जारी करावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, भाजप नेते त्यांचे बॅाडी गार्ड वृत्तपत्रे प्रतिनिधीं व पत्रकारांना त्या विषयी प्रश्न विचारण्यास मज्जाव केल्याचे देखील टीव्ही चॅनेल वर पहायला मिळत असून, सोमैयांनी मालेगाव मध्ये असलेल्या अतिरेकी केंद्रा बद्दल जाहीर वक्तव्ये केलीत, त्या शिवाय ४,६०० बांगलादेशी अतिरेकी घुसल्याचा सनसनाटी आरोप देखील केला आहे.
या सर्व प्रकरणाची मालेगांव,  जिल्हा नाशिक प्रशासनाने, जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी कार्यालयाने या बाबत सत्य वास्तवते बाबत तातडीने खुलासा करावा.. ही सर्व नेमकी माहिती किरीट सोमैयांचे कडे असतांना, ती संबंधित पोलीस व प्रशासकीय यंत्रणेकडे का दिली नाही (?) असा सवाल ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विचारला.

संबंधित माहिती पोलीस प्रशासनास देण्याऐवजी ती स्वतः कडे ठेवल्याबद्दल किरीट सोमैयांना पोलीस प्रशासनाने तातडीने ताब्यात घेऊन, त्यांनी अतिरेकी अड्डा बाबत केलेल्या आरोपांची सखोल चौकशी करावी व वास्तवता जिल्हा प्रशासनाने पुढे आणावी.. अन्यथा साप साप म्हणून भूई थोपटून विशिष्ट धर्मा बद्दल भय, भिती, संशय व द्वेषाचे समाजात कलुषित वातावरण करू पाहणाऱ्या माजी खा. किरीट सोमैयांवर सामाजिक सलोखा व शांतता भंग करण्याच्या आरोपाखाली कारवाई करावी..अशी मागणी देखील प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading