Wednesday, August 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

… त्याने महापालिकेच्या राजकारणापासून लांब राहावे

 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य

मुंबई प्रतिनिधी

स्वीकृत नगरसेवकाच्या मागणीवरून शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण rयांच्या युतीमध्ये मिठाचा खडा पडला असल्याची चर्चा असतानाच त्याबाबत भाष्य करण्यास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नकार दिला. ज्याला मुंबईत सुखाने राहायचे आहे त्याने महापालिकेच्या राजकारणापासून दूरच राहावे, असे वक्तव्य ही त्यांनी केले.

मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला येणाऱ्या स्वीकृत नगरसेवकांच्या तीन जागांपैकी एक जागा मनसेला मिळावी अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली. मात्र, त्याची दखल न घेता शिवसेना ठाकरे गटाने आपल्या विकृत नगरसेवकांची नावे पाठवून दिली आहेत. त्यावर मनसे कडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, कोट्या मनांच्या माणसांकडून काय अपेक्षा बाळगणार, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे..

दुसरीकडे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवासस्थानी जाऊन घेतलेली भेट ठाकरे गटाला रुचलेली नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना शिंदे गटाला मनसेचे सहकार्य राहील, अशी ग्वाही देखील राज ठाकरे यांनी शिंदे यांना दिली आहे.

या दोन्ही घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात राऊत यांनी नकार दिला. आपण कायम महापालिकेच्या राजकारणापासून दूर आहोत. आपले काम वेगळे आहे. त्यात चलावर राहण्याची आपली इच्छा नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading