Monday, April 6, 2026
Latest NewsMAHARASHTRA

ओबीसी बांधवांनी आपल्या हक्काच्या लढ्यापासून स्वतःला दूर ठेवणे दुर्दैवी – आनंदराज आंबेडकर

 

छत्रपती संभाजीनगर – ओबीसींच्या हक्काचा मंडल आयोगाचा लढा आणि आजचा युजीसी इक्विटी बिलाचा लढा हा आंबेडकरी समुदायाने जात-धर्म हा भेद न करता सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून लढला परंतु या लढ्यापासून अलिप्त राहणाऱ्या ओबीसी समाजाने आता स्वतःचा लढा स्वतः लढला पाहिजे.

धर्माच्या नावाने राजकारण करणारे आणि स्वतःला उच्चवर्णीय समजणारे लोक SC, ST, OBC ला कायम तुच्छ लेखत आलेत UGC इक्विटी बिलाच्या प्रकरणात ओबीसींना कुणापासून धोका आहे हे स्पष्ट झाले असून ओबीसींनी धर्माच्या नावावर गुलामी झुगारून आपले मित्र ओळखावेत, ओबीसी बांधवांनी आपल्या हक्काच्या लढ्यापासून स्वतःला दूर ठेवणे दुर्दैवी आहे अशी खंत आज छ. संभाजीनगर येथे व्यक्त केले.

रिपब्लिकन सेना, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट येथे भेदभावमुक्त शिक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाची दैनिक सम्राट मधील फ्रंटपेज वरील वृत्त आणि अंक भेट देण्यात आला.

यावेळी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुशील सूर्यवंशी, प्रदेश नेते प्राचार्य सुनील वाकेकर, रिविसे चे सचिन निकम, राज्य सदस्य चंद्रकांत रुपेकर, जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड, मिलिंद मोकळे, शहरप्रमुख नितीन वाकेकर, शहर अध्यक्ष राहुल गवळी, रिविसे मराठवाडा संघटक सागर गायकवाड, शकील शेख, प्रवक्ते सुनील पांडे, आशिष गर्जे, प्रवीण शिंदे, मधुकर मघाडे आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading