Monday, May 25, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही – शरद पवार

 

पुणे:  दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांच्या विलीनीकरणाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून दोन्ही पक्षाचे नेते त्याबाबत निर्णय घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी स्पष्ट केले. वास्तविक विलीनीकरणाबाबत १२ तारखेला घोषणा करण्याचे ठरले होते, असेही त्यांनी सांगितले.

दोन्ही पक्ष एकत्र यावे, अशी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इच्छा होती. आमचीही तशीच इच्छा आहे. याबाबत आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात चर्चा सुरू होती. मी त्या चर्चेत नव्हतो, असेही पवार म्हणाले.

सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार असल्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. त्यात आपली काही भूमिका नाही. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचेही पवार यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री पदाबाबत काल मुंबईत वेगवान घडामोडी घडल्या. अजित पवार गटाच्या नेत्यांनी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेते पदावर निवड करण्यात येईल. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी पार पडणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading