Wednesday, October 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ; उद्या शपथविधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) नेत्या सुनेत्रा पवार उद्या महाराष्ट्राच्या नव्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री पद रिक्त झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत हा निर्णय घेण्यात आला  आहे.

या संदर्भात उद्या दुपारी २ वाजता मुंबईतील विधानभवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून, त्यात सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सायंकाळी शपथविधी सोहळा पार पडण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुनेत्रा पवार या सध्या राज्यसभेच्या खासदार आहेत. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या त्या सदस्य नसल्या तरीही त्यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती होऊ शकते. जर त्यांची नियुक्ती झाली तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील.

महाराष्ट्राचे मंत्री छगन भुजबळ यांनीही सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे येत असल्याचे संकेत दिले आहेत.
“सुनेत्रा पवार यांना ही जबाबदारी द्यावी अशी अनेकांची भावना आहे आणि ती मागणी अवाजवी नाही,” असे भुजबळ यांनी सांगितले.

एनसीपीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले की, सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीला पक्षात कोणताही विरोध नाही.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असून सरकार त्याचा सन्मान करेल.
“एनसीपी जो निर्णय घेईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ. पवार कुटुंबीयांसोबत सरकार आणि भाजप ठामपणे उभे आहेत,” असे फडणवीस म्हणाले.

Leave a Reply