Thursday, May 14, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

… तर हिरावून घेतला जाईल महायुतीच्या तोंडचा घास

शिवसेना ठाकरे गटाला लागू शकेल महापौर पदाची लॉटरी

मुंबई प्रतिनिधी

महापालिकेत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांनी 118 जागा मिळवून काठावरचे का होईना, बहुमत प्राप्त केले आहे. तरी देखील महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत एक विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यास बहुमत असूनही महायुतीला महापौर पदावर पाणी सोडावे लागेल आणि महापालिकेत क्रमांक दोनचा पक्ष ठरलेल्या शिवसेना ठाकरे गटाला महापौर पदाची लॉटरी लागू शकेल.

महापौर पदासाठी आरक्षणाची सोडत काढताना नव्याने अमलात आणलेल्या चक्राकार पद्धतीचा वापर केला गेला आणि त्यामध्ये मुंबईचे महापौर पद अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले तर या प्रवर्गातून भाजप अथवा शिवसेना शिंदे गट यांचा एकही उमेदवार निवडून न आल्याने बहुमतामुळे त्यांच्या हाती आलेला महापौर पदाचा घास हिरावून घेतला जाण्याची शक्यता आहे.

त्याचवेळी 65 जागा मिळवून महापालिका सदस्य संख्येत दुसऱ्या स्थानावर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे जितेंद्र वळवी आणि प्रियदर्शनी ठाकरे हे दोन उमेदवार अनुसूचित जमाती या प्रवर्गातून निवडून आले आहेत. त्यामुळे हे आरक्षण महापौर पदासाठी निश्चित झाल्यास बहुमत नसतानाही महापौरपदाची माळ शिवसेना ठाकरे गटाच्या गळ्यात पडू शकते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading