Wednesday, June 3, 2026
BusinessLatest NewsLIFESTYLE

टायटन रागाचे नवे कलेक्शन ‘ग्लिमर्स’, कॅम्पेनमध्ये आलिया भटचा सहभाग

बंगलोर :  आयुष्यातील काही क्षणांना उजळवण्यासाठी एक लहानशी पण कधीही  विसरता येण्याजोगी ठिणगी पुरेशी असतेएकमेकांकडे पाहून हसण्यामध्ये लपलेली आशा असोदयाळू भावनेतून अचानक केलेल्या कृतीची शक्ती असोआत्मचिंतनातून लाभणारी शांतता असोहे क्षणभंगुर पण तेजस्वी क्षण आशा वाढवतात आणि काही खास आठवणी निर्माण करतातया आठवणी म्हणजे आम्ही आहोतटायटन रागाने या शक्तिशाली आणि जादुई क्षणांना एका अविस्मरणीय स्टाईलमध्ये बदलण्यासाठी प्रस्तुत केले आहे रागा ग्लिमर्सतुमच्या आयुष्याची चमक साजरी करणाऱ्या या कलेक्शनसाठी तयार करण्यात आलेल्या खास कॅम्पेनमध्ये रागाचा चेहरा म्हणून आलिया भट झळकत आहेसहज आत्मविश्वासस्वतःचा करिष्मा आणि सणांचा आनंद दर्शवत आलियाने ही नवी घड्याळे प्रस्तुत केली आहेत.

 

सण आणि प्रियजनांच्या भेटीगाठी यामधून मिळणारा मन सुखावणारा आनंद ही या कलेक्शनची प्रेरणा आहे. स्वयंप्रकाशी असलेल्या आणि स्वतः जशा आहेत तशा, जराही न डगमगता, लीलया वावरणाऱ्या महिलांचा सन्मान हे कलेक्शन करते. ती फक्त वाटचाल करत नाही तर स्वतःला नव्याने घडवते. हेच सार या कॅम्पेनच्या टॅगलाईनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे – ‘ऑल दॅट ग्लिमर्स, इज अस’ – शक्ती, व्यक्तित्व आणि प्रतिभा यांची एकत्रित चमक या कलेक्शनमध्ये आहे, जी आजची महिला प्रत्येक क्षेत्रात दाखवत आहे. रागा ग्लिमर्समधली डिझाइन्स महिलांची ही चमक दर्शवतात, म्हणूनच ती उठावदार व फॅशन-फॉरवर्ड आहेत. ही घड्याळे अशा महिलांसाठी तयार केलेली आहेत ज्या योगायोग जुळून आला म्हणून नव्हे तर स्वतः ठरवून, निवडून चमकतात.

कलेक्शनचे शोस्टॉपर रेडियन्ट हार्टमध्ये एक हलणारे बेझेल आहे, यामध्ये तब्बल २१६ गुलाबी, जांभळ्या आणि सफेद स्टोन्स चमचमतात. रोज गोल्ड बार्क-फिनिश स्ट्रॅप याला जोडलेला आहे. अस्सल डिझाईन आणि उठावदार रूप असलेले रागा ग्लिमर्स हे अशा महिलांसाठी डिझाइन केलेले आहे, ज्यांच्यासाठी ऍक्सेसरीज म्हणजे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. ज्वेल-टोन साड्या किंवा संध्याकाळच्या कार्यक्रमासाठीच्या ड्रेससोबत हे घड्याळ म्हणजे प्रत्येक नजर फक्त तुमच्यावर खिळणार हे नक्की. तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक क्षण अविस्मरणीय करण्याचा प्रभाव हे घड्याळ निर्माण करते.

सेलेस्टे बो घड्याळाचा क्लासिक धनुष्याचा आकार, २७४ चमकदार स्टोन्सचा वापर यामुळे कॉउचरप्रमाणे प्रभाव निर्माण होतो. आधुनिक असले तरी, सणासुदीसाठी अगदी साजेसे असे हे घड्याळ म्हणजे उत्सव आणि स्टाईल यांचे प्रतीक आहे.   स्लीक फ्यूजन वेअर किंवा एलिगंट गाऊनसह हे स्टेटमेंट घड्याळ म्हणजे अप्रतिम ग्लॅमर! ज्यामुळे तुमचा उत्सवाचा प्रत्येक लूक सहजपणे तेजस्वी आणि अविस्मरणीय बनतो.

सिक्रेट अवर घड्याळामधील सफेद मदर-ऑफ-पर्ल आणि फॉरेस्ट ग्रीन सनरे डायल असलेली स्लाइडिंग स्क्वेअर केस म्हणजे एकाच गोष्टीत अनेक पैलू समाविष्ट करण्याची क्षमता.  याचे प्रत्येक रूप महत्वाकांक्षा, साहस आणि आत्म-अभिव्यक्तीची कहाणी आहे, ज्यामुळे ते विविध क्षेत्रातील महिलांसाठी एक परिपूर्ण ऍक्सेसरी बनू शकते. दिवस असो वा रात्र…हे घड्याळ तुमच्या लयीशी सहजतेने जुळवून घेते.

हे कलेक्शन इतरांपेक्षा वेगळे असण्याचे कारण म्हणजे त्याचे कलात्मक डिझाईन. यातील प्रत्येक घड्याळ म्हणजे एक रत्न भासते, उच्च दर्जाच्या फॅशनचे सिल्हट आणि आर्किटेक्चरल कलात्मकतेसह, या श्रेणीत धनुष्याच्या आकाराच्या केसेस आहेत. शानदार, असममित आणि उलट करता येण्याजोग्या डायल, चौरस-वक्र आकार म्हणजे शक्तीचे शानदार, सुरेख रूप. हे चमकदार क्रिस्टल-स्टडेड ब्रेसलेट म्हणजे जणू मनगटावर अवतरलेली कविता. यातील प्रत्येक घड्याळ महिलांना त्यांची अनोखी ओळख निर्माण करण्यासाठी, सणासुदीमध्ये स्वतःची स्टाईल निर्माण करण्यासाठी डिझाईन केले आहे.

 

लाँच प्रसंगी बोलताना, टायटन कंपनी लिमिटेडच्या टायटन वॉचेस आणि रागाच्या मार्केटिंग प्रमुख श्रीमती अपर्णा रवी म्हणाल्या, “रागा ग्लिमर्ससह, आम्हाला डिझाइनपुरते मर्यादित न राहता अशा भावना टिपायच्या होत्या ज्या महिलांचे तेज, आशा आणि आनंदाचे प्रतिबिंब बनतील, अशा महिला ज्या संकोच न करता चमकतात. त्यांची ती चमक त्यांच्या प्रत्येक काळजीने केलेल्या कृतीत, त्यांनी जोपासलेल्या प्रत्येक संबंधांमध्ये आणि त्यांच्या प्रत्येक धाडसामध्ये दिसून येते. ग्लिमर्सची निर्मिती याच आत्मविश्वासातून झाली. आलिया भटच्या सहभागामुळे आमची भावना अतिशय आत्मविश्वासाने साकार झाली आहे. आम्हाला खात्री आहे की, सणासुदीमध्ये हे कलेक्शन स्टाईल वाढवेल, शिवाय रागा आणि ते ज्या महिलांसाठी बनवले आहे त्या महिला यांच्यातील नाते अधिक दृढ होईल.”

८,३९५ रुपये ते २८,७९५ रुपये किंमतीच्या या कलेक्शनमध्ये १६ अतिशय अनोखे एसकेयू आहेत. नावीन्य आणि सणांची कलात्मकता साजरी करणारे रागा ग्लिमर्स आता सर्व टायटन आउटलेट्समध्ये आणि titan.co.in वर ऑनलाइन उपलब्ध आहे. हे कलेक्शन महिलांना त्यांचे आंतरिक तेज स्वीकारण्यासाठी आणि त्यांनी जगात निर्माण केलेल्या तेजाचा उत्सव साजरा करण्यासाठी आमंत्रित करते. कारण प्रत्येक उत्सवात, प्रत्येक नात्यामध्ये आणि प्रत्येक अविस्मरणीय क्षणात – जे काही चमकते ते आपणच असतो.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading