Friday, October 30, 2026
Latest NewsPUNE

PMPML : रक्षाबंधन सणानिमित्त आयोजित ‘लकी-ड्रॉ’ योजनेतील बक्षीस वितरण सोहळा संपन्न

विजेत्या महिलांना पैठणी व एक महिन्याच्या मोफत बस प्रवास पासचे वितरण.

पुणे : रक्षाबंधन सणानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) तर्फे दि. ०९ ऑगस्ट २०२५ रोजी, पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  पंकज देवरे यांच्या संकल्पनेतून महिला प्रवाशांसाठी ‘लकी-ड्रॉ’ योजनेचे आयोजन करण्यात आले होते. या योजनेची सोडत दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी संगणकीय पद्धतीने करण्यात आली होती.

या ‘लकी-ड्रॉ’ योजनेचा बक्षीस वितरण सोहळा आज दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी स्वारगेट येथील प्रशिक्षण हॉल येथे संपन्न झाला.

या सोहळ्यात पीएमपीएमएल चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या हस्ते, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती आशा राऊत, कलाक्षेत्रम सिल्क अँड सारीज, लक्ष्मी रोड, पुणे या भव्य दालनाचे मालक सागर पासकंठी, रेडिओ मिरचीचे आर. जे. निमी,  केतन धस यांच्या उपस्थितीत सर्व विजेत्या महिला प्रवाशांना कलाक्षेत्रम सिल्क अँड सारीज, लक्ष्मी रोड, पुणे यांचेकडून पैठणी व पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून एक महिन्याचा सर्व मार्गासाठी मोफत बस प्रवास पास प्रदान करण्यात आले.

यावेळी शितल माचुत्रे, माया बर्वे, रंजना कांबळे, कविता चव्हाण, पौर्णिमा भोसले, सुनिता मुरंबे, अंचली गोणारकर, पूजा वैद्य, ऋतुजा सावंत, मिना बोदरे, प्रेरणा पवार, रेखा यरमवार, तनिष्का निकम या ‘लकी-ड्रॉ’ योजनेतील महिला विजेत्यांना पैठणी व एक महिन्याचा सर्व मार्गासाठी मोफत बस प्रवास पास प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी पीएमपीएमएलच्या विविध विभागांचे विभागप्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते.
पीएमपीएमएलतर्फे या उपक्रमाद्वारे महिला प्रवाशांना प्रोत्साहन देण्याचा आणि प्रवासी सेवेत गुणवत्तावृद्धी करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply