फिजिक्सवाला लिमिटेडने आयपीओद्वारे ₹3,820 कोटी उभारण्यासाठी दाखल केले सेबीकडे UDRHP-I
फिजिक्सवाला लिमिटेड (“कंपनी”) ही भारतातील सर्वात मोठी विद्यार्थी समुदाय असलेली शैक्षणिक कंपनी असून, महसुलाच्या दृष्टीने देशातील टॉप 5 शिक्षण कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीने प्राथमिक समभाग विक्रीसाठी (IPO) सेबीकडे UDRHP-I दाखल केले आहे. कंपनीचा मुख्य यूट्यूब चॅनेल “Physics Wallah – Alakh Pandey” याचे 15 जुलै 2025 पर्यंत सुमारे 13.7 मिलियन सबस्क्राइबर्स आहेत (रेडसीअर रिपोर्टनुसार).
या IPO अंतर्गत एकूण ऑफर साइज ₹38,200 मिलियन (₹3,820 कोटी) एवढा आहे. यात ₹31,000 मिलियन (₹3,100 कोटी) किमतीचे नवे इक्विटी शेअर्स जारी करण्यात येणार असून, ₹7,200 मिलियन (₹720 कोटी) किमतीच्या इक्विटी शेअर्सचा ऑफर फॉर सेल समाविष्ट आहे. प्रत्येक इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू ₹1 असेल.
फिजिक्सवाला लिमिटेडने नव्या समभाग विक्रीतून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा वापर विविध धोरणात्मक आणि ऑपरेशनल गरजांसाठी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. यात कंपनीच्या नव्या ऑफलाइन आणि हायब्रिड सेंटर्ससाठी फिट-आउट्सवरील भांडवली खर्च, तसेच विद्यमान निवडक ऑफलाइन आणि हायब्रिड सेंटर्सच्या भाडेपट्टीवरील खर्चाचा समावेश आहे. याशिवाय, सहायक कंपनी Xylem Learning Private Limited मध्ये गुंतवणूक करून नव्या Xylem ऑफलाइन सेंटर्ससाठी फिट-आउट्सवर भांडवली खर्च आणि त्यांच्या विद्यमान ऑफलाइन सेंटर्स व होस्टेल्ससाठी भाडेपट्टीवरील खर्च भागविण्याची योजना आहे, तसेच सहायक कंपनी Utkarsh Classes & Edutech Private Limited मध्ये गुंतवणूक करून त्यांच्या विद्यमान ऑफलाइन सेंटर्सच्या भाडेपट्टीसाठी निधी वापरण्याचा मानस आहे. कंपनी सर्व्हर व क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च, मार्केटिंग उपक्रम, Utkarsh Classes & Edutech Private Limited मधील अतिरिक्त भागभांडवल खरेदी, तसेच अज्ञात अधिग्रहणांद्वारे इनऑर्गेनिक ग्रोथ आणि इतर सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठीही निधी वापरणार आहे.
फिजिक्सवाला लिमिटेडच्या IPO अंतर्गत ऑफर फॉर सेलद्वारे एकूण ₹7,200 मिलियन (₹720 कोटी) किमतीचे इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. यातून ₹3,600 मिलियन (₹360 कोटी) किमतीचे शेअर्स अलख पांडे आणि ₹3,600 मिलियन (₹360 कोटी) किमतीचे शेअर्स प्रतीक बूब विकणार आहेत. हे दोघेही प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स आहेत.
फिजिक्सवाला मुख्यतः स्पर्धा परीक्षांसाठी टेस्ट प्रीपरेशन कोर्सेस उपलब्ध करून देतो. याशिवाय, अपस्किलिंगसाठी विविध कोर्सेसही दिले जातात. हे कोर्सेस विद्यार्थ्यांपर्यंत तीन मार्गांनी पोहोचविले जातात, ऑनलाइन (कंपनीची वेबसाइट आणि अॅप्स), टेक-सक्षम ऑफलाइन सेंटर्स (जिथे प्राध्यापक प्रत्यक्ष केंद्रात लाइव्ह क्लास घेतात) आणि हायब्रिड सेंटर्स. हायब्रिड सेंटर्समध्ये टू–टीचर मॉडेल राबविले जाते, ज्यामध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष केंद्रात बसून ऑनलाइन लाइव्ह क्लास अटेंड करतो, तसेच तिथे उपस्थित दुसरा शिक्षक शंका निरसन आणि रिव्हिजन क्लासेससाठी मदत करतो.
रेडसीअर रिपोर्टनुसार, फिजिक्सवाला लिमिटेड महसुलाच्या दृष्टीने भारतातील टॉप 5 शिक्षण कंपन्यांपैकी एक आहे. कंपनीचा मुख्य यूट्यूब चॅनेल “PhysicsWallah-Alakh Pandey”चे 15 जुलै 2025 पर्यंत सुमारे 13.7 मिलियन सबस्क्राइबर्स आहेत. त्यांच्या संपूर्ण यूट्यूब समुदायाचे 30 जून 2025 पर्यंत 98.80 मिलियन सबस्क्राइबर्स होते आणि वित्तीय वर्ष 2023 ते 2025 दरम्यान तो 41.80% CAGR दराने वाढला. महसुलाच्या दृष्टीने ऑफलाइन उपस्थितीबाबतही फिजिक्सवाला भारतातील महत्त्वाच्या शैक्षणिक कंपन्यांमध्ये गणला जातो. महसूल वृद्धीच्या दृष्टीने कंपनी वित्तीय वर्ष 2022 ते 2024 दरम्यान सर्वात वेगाने वाढणाऱ्या शिक्षण कंपन्यांपैकी एक ठरली आहे.
या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस अंतर्गत ऑफर करण्यात येणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) वर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. (हे म्हणजे लिस्टिंग डिटेल्स आहेत).
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जे. पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड आणि अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड या कंपन्या या इश्यूच्या बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
