Wednesday, June 10, 2026
BusinessLatest News

जीएसटी रिफॉर्म्समुळे एमएसएमईना दिलासा आणि नव्या संधी

 अर्थमंत्र्यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या जीएसटी रिफॉर्म्सचे भारतातील मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्रायजेस (एमएसएमईज) क्षेत्रातर्फे स्वागत करण्यात आले आहे. जीएसटी नियमांचे पालन सोपे करण्यासाठी आणि रिपोर्टिंग स्ट्रक्चर आणखी मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आलेले हे बदल प्रशासनातील अडथळे कमी करतील व स्त्रोतांना विकास करण्यासाठी जास्त वाव देतील अशी अपेक्षा आहे.

जीएसटी नियमात सुरळीतपणा आणत हा तणाव कमी करून दैनंदिन कामकाज सुलभ करण्याचे तसेच रोखीचा प्रवाह अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित करण्याचे ध्येय आहे.

या नव्या रिफॉर्म्सविषयी गोदरेज कॅपिटलचे एमडी आणि सीईओ मनीष शहा म्हणाले, ‘जीएसटीमध्ये नुकतेच करण्यात आलेले बदल जीएसटी नियमांचे पालन करण्यातील गुंतागुंत काढून टाकण्यास मदत करतील व पर्यायाने एमएसएमईजना रिपोर्टिंगच्या सुस्पष्ट गरजा कळतील. यामुळे व्यवसायांना खेळते भांडवल अधिक कार्यक्षमपणे हाताळणे आणि विकासाचे नियोजन करणे शक्य होईल. दरम्यान व्यवहारांची जास्त स्पष्ट नोंद राखल्यामुळे कर्जपुरवठादारांना कर्ज क्षमतेचे जास्त चांगल्या प्रकारे विश्लेषण करता येईल आणि एमएसएमईजना औपचारिक मार्गांनी कर्ज घेण्याची प्रेरणा मिळेल. एकंदरीत हे रिफॉर्म्स कामकाजातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक आराखडा पुरवतील आणि आर्थिक संस्थांसंह संवाद दमदार करतील.’

भारत अधिक मोठ्या आर्थिक औपचारिकीकरणाच्या दिशेने जात असून हे रिफॉर्म्स एमएसएमईजना प्रगती करण्यासाठी आवश्यक वातावरण पुरवतील. कर्जपुरवठादारांना जास्त आत्मविश्वासासह काम करता येईल आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला विकास व प्रगतीच्या सातत्यपूर्ण चक्रातून लाभ होत राहील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading