पुण्यात कॉस्मो पीपीएफचा विस्तार; रंग संरक्षणाची जागरूकता वाढवण्यासाठी कॉस्मो फर्स्टचा मोबाइल व्हॅन उपक्रम
पुणे : पॅकेजिंग, लेबलिंग, लॅमिनेशन आणि इतर गोष्टींसाठीच्या स्पेशॅलिटी फिल्म्समधील आघाडीची जागतिक उत्पादक कंपनी कॉस्मो फर्स्टच्या ऑटोमोटिव्ह पेंट प्रोटेक्शन फिल्म्समधील प्रीमियम ब्रँड कॉस्मो पीपीएफने आता पुण्यात प्रवेश केला आहे. मोबाईल व्हॅन उपक्रमाद्वारे महाराष्ट्रात आपला विस्तार करण्याची घोषणा केली आहे. मजबूत दृश्यमानता, ऑटो डिटेलर्स, स्टुडिओ मालक आणि कारप्रेमी लोकांशी संवाद साधण्यासाठी तसेच शहरात प्रीमियम पेंट प्रोटेक्शन सोल्यूशन्सचा अवलंब अधिक भक्कम करण्यासाठी हा उपक्रम तयार केला आहे.
कंपनीचे कॉस्मो पीपीएफ व्हर्टिकल ग्राहकांना त्यांच्या वाहनाचे मूळ स्वरूप तसेच कायम ठेवण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी एक उत्तम पर्याय देते. कॉस्मो पीपीएफच्या प्रमुख गुणधर्मांमध्ये स्क्रॅच प्रतिरोध, नावीन्यपूर्ण सेल्फ हीलिंग तंत्रज्ञान, हायड्रोफोबिक गुणधर्म आणि सर्वसमावेशक यूव्ही तसेच रासायनिक संरक्षण यांचा समावेश आहे. उत्पादन श्रेणीमध्ये वेगवेगळ्या संरक्षण गरजांसाठी तयार केलेले कॉस्मो पीपीएफ प्लॅटिनम आणि कॉस्मो पीपीएफ गोल्ड असे दोन भिन्न प्रकार आहेत. कॉस्मो पीपीएफच्या सेल्फ हीलिंग वैशिष्ट्यात सौंदर्याचा देखील विचार करण्यात आला आहे. ज्यामुळे उत्कृष्ट आणि सर्वसमावेशक ऑटोमोटिव्ह संरक्षण उपाय देण्याची कंपनीची वचनबद्धता बळकट होते.
कॉस्मो पीपीएफ प्लॅटिनम, या प्रीमियम ऑफरमध्ये प्रभावी 8-एमआयएल जाडी आणि आजीवन वॉरंटी आहे तर कॉस्मो पीपीएफ गोल्ड 5 वर्षांच्या वॉरंटीसह दीर्घकालीन संरक्षणाचे आश्वासन देते. उच्च-गुणवत्तेच्या थर्मोप्लास्टिक पॉलीयुरेथेन (टीपीयू) तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम श्रेणीतील प्रगत प्रेशर सेन्सिटिव्हसह या फिल्म्स शोरूमसारखे फिनिश राखण्यासाठी, पर्यावरणीयदृष्ट्या हानिकारक पदार्थांना दूर ठेवण्यासाठी आणि रंगाचे नुकसान रोखण्यासाठी तयार केले आहेत. याव्यतिरिक्त, कॉस्मो पीपीएफ प्रामुख्याने भारतीय रस्ते आणि हवामान परिस्थितीसाठी डिझाइन केले आहे. यामुळे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण होईल.
कॉस्मो पीपीएफचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “महाराष्ट्र ही धोरणात्मकदृष्ट्या आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. आणि गतिमान ऑटोमोटिव्ह केंद्र असल्याने पुणे हे व्यावसायिक आणि कारप्रेमी लोकांशी जोडण्यासाठी संधी उपलब्ध करून देते. कॉस्मो पीपीएफच्या प्रीमियम सोल्यूशन्ससह, आम्ही दीर्घकालीन संरक्षण प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. तसेच भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीशी अनुरूप असणाऱ्या उत्पादनांसह भक्कम पाठबळ मिळते. आणि भारताच्या वाढत्या पीपीएफ बाजारपेठेत तो एक विश्वासार्ह भागीदार बनतो.”
या उपक्रमाचा एक भाग म्हणून, एक संपूर्णपणे सुसज्ज अशी ब्रँडेड मोबाइल व्हॅन विमान नगर, खराडी, मगरपट्टा, उंड्री, कॅम्प, शिवाजी नगर, औंध, बावधन, हिंजवडी, चिंचवड, ताथवडे अशा प्रमुख ऑटोमोटिव्ह क्लस्टर्सना कव्हर करेल. या दरम्यान, कॉस्मो पीपीएफचे प्रतिनिधी व्यावसायिकांशी सविस्तरपणे संवाद साधतील आणि त्यांना कॉस्मो पीपीएफच्या टिकाऊ, उच्च-कार्यक्षमता असलेल्या फिल्म सोल्यूशन्सची ओळख करून देतील. मोबाइल ब्रँड शोकेस म्हणूनही ही व्हॅन काम करेल. ज्यामुळे कॉस्मो पीपीएफची तपशीलवार आणि ऑटोमोटिव्ह केअर सेगमेंटसाठीची वचनबद्धता बळकट होते.
1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर 2025 असे सहा दिवस पुण्यात ही मोहीम राबवली जाईल. यात कॉस्मो पीपीएफ उत्पादन जागरूकता तसेच ब्रँडचा विस्तार वाढवण्यासाठी हब, गॅरेज आणि ऑटोमोटिव्ह क्लस्टर्सना भेटी दिल्या जातील.
