भारतीय संरक्षण मंत्रालयासमोर शील्ड एआयने हिव्हमाइंड प्रात्यक्षिक यशस्वीरित्या पूर्ण केले
नवी दिल्ली : शिल्ड एआय या अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि लढाऊ विमाने तयार करणाऱ्या डीप टेक कंपनीने, आज भारतीय संरक्षण मंत्रालयासाठी (MoD) हिव्हमाईंडच्या साहाय्याने महत्त्वाचे प्रात्यक्षिक यशस्वीरित्या सादर केले. ही प्रात्यक्षिके म्हणजे एमओडी प्रमाणीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे त्यांना सध्या अधिग्रहणासाठी विचाराधीन असलेल्या व्ही-बॅट्सवर हिव्हमाइंडचा वापर करण्यासाठी औपचारिक मान्यता मिळते. या मान्यतेमुळे भारतीय सैन्यदल तसेच भारतीय हवाई दल अधिक सुसज्ज होणार आहे.
12 ते 14 ऑगस्ट 2025 दरम्यान हिमाचल प्रदेशात शील्ड एआयच्या नोव्हा 2 क्वाडकॉप्टरचा, वापर करून हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते, जे शील्ड एआयचे ऑटोनॉमस सॉफ्टवेअर हिव्हमाइंडने सुसज्ज होते. भारतीय विशेष दलांना (भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दल, या दोघांकडून) प्रत्यक्ष उड्डाण प्रशिक्षण आणि यंत्रणेची माहिती देण्याच्या तीन दिवसांच्या कालावधीत, हिव्हमाइंडने जीपीएस तसेच कम्युनिकेशन नसलेल्या वातावरणात एआयचे सहकार्य मिळालेले आणि ह्युमन ऑपरेटेड ऑपरेशनचे प्रात्यक्षिक दाखवले.
“संरक्षण क्षेत्राच्या भविष्यात स्वायत्तता हा एक अत्यंत निर्णायक घटक असेल आणि या क्षेत्रात नेतृत्व करण्याचा आपला मानस भारताने स्पष्ट केला आहे,” असे शील्ड एआयचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक सर्जन शाह म्हणाले. “हिव्हमाईंडच्या माध्यमातून, शिल्ड एआय मोहिमेसाठी अत्यंत योग्य आणि तत्पर असे स्वायत्त तंत्रज्ञान पुरवते आहे. जे अत्यंत बिकट परिस्थितीतही प्रभावीपणे कार्य करते. राष्ट्रीय सुरक्षा बळकट करणाऱ्या तसेच स्वदेशी संरक्षण नवकल्पनांना पाठिंबा देणाऱ्या पुढच्या पिढीच्या क्षमतांचा वेगाने अवलंब करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याच्या प्रवासातील ही प्रात्यक्षिके म्हणजे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” असेही त्यांनी पुढे म्हटले.
हिव्हमाइंड हे शील्ड एआयचे ऑटोनॉमस सॉफ्टवेअर आहे जे मानवरहित प्रणालींना जीपीएस आणि कम्युनिकेशन्स नसलेल्या वातावरणात कठीण, गुंतागुंतीच्या मोहिमा राबवण्यासाठी सक्षम करते. मॉड्युलर इंटिग्रेशन आणि मल्टी-प्लॅटफॉर्म तैनातीसाठी डिझाइन केलेले हिव्हमाइंड भागीदारांना आणि ग्राहकांना व्ही-बॅट आणि शील्ड एआयच्या ग्रुप 3 मानवरहित हवाई प्रणालीसह (UAS) विविध प्लॅटफॉर्मवर जलद गतीने तयार करण्यास, चाचणी करण्यास आणि फील्ड मिशन स्वायत्तता तयार करण्यास सक्षम करते.
नोव्हा 2 हा पुढच्या पिढीचा क्वाडकॉप्टर आहे जो 3डी वातावरणासाठी पोषक आहे, इनडोअर (GNSS-नसलेला) आणि मर्यादित-जागा ऑपरेशन्ससाठी मोठ्या प्रमाणात स्वायत्तता देतो. नोव्हा क्वाडकॉप्टरमध्ये हिव्हमाइंडच्या एकत्रीकरणातून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे F-16, MQ-20 अॅव्हेंजर आणि V-BAT सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर हिव्हमाइंडबद्दल माहिती मिळाली आहे.
हिव्हमाइंड खरोखरच एकात्मिक होऊ शकते आणि विविध प्लॅटफॉर्मवर क्लिष्ट, गुंतागुंतीचे मिशन सोडवण्यास योग्य ठरू शकते, याचे यशस्वी प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी ही सीरिज अत्यंत योग्य आहे. भारताच्या संरक्षण क्षमता मजबूत करण्यतील शील्ड एआयच्या भूमिकेला या कामगिरीमुळे अधिक भक्कम समर्थन मिळते. तसेच या क्षेत्रातील कंपनीच्या विस्ताराला अधिक पाठबळ देते. नोव्हेंबर 2024 मध्ये, शील्ड एआयने जेएसडब्ल्यू डिफेन्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत एका धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. त्या माध्यमातून भारतात व्ही-बॅट्सचे स्वदेशीकरण आणि उत्पादन सुरू करण्यासाठी, भारताच्या संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण वचनबद्धता त्यांनी सिद्ध केली.
