Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

स्टेम सेल दानाच्या जनजागृतीसाठी दात्री व सह्याद्रि रुग्णालयाचा दाता-अवयवप्राप्तकर्ता मेळावा

पुणे सह्याद्रि हॉस्पिटल आणि दात्री ब्लड स्टेम सेल डोनर्स रजिस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष दाता-अवयवप्राप्तकर्ता (Donor-Recipient meet) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम २३ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडला. अवयवदानाविषयी माहिती घेण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली. अवयवदानाविषयी माहिती मिळाल्याने याविषयी अनेकांना प्रेरणा मिळाली. दात्याच्या निःस्वार्थ दानामुळे आराध्या व श्रुती (नावे बदलली आहेत) या जुळ्या बहिणींना नवे जीवनदान मिळले. ही हृदयस्पर्शी आणि दुर्मिळ घटना या कार्यक्रमात सर्वांना सांगण्यात आली. दोन्ही जुळ्या बहिणींना साडेतीन वर्षाच्या वयात अक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया’(Acute Lymphoblastic Leukemia – ALL)  हा गंभीर रक्ताचा आजार झाला होता.

या हृदयस्पर्शी कार्यक्रमात हैदराबाद येथील दाता श्री. राजेश (नाव बदलले आहे) यांची संबंधित दोन लहान जुळ्या बहिणींशी भेट झाली. श्री. राजेश यांनी त्यांचे स्टेम सेल या दोन्ही मुलींना दान केल्याने त्यांचे प्राण वाचले. या पुनर्मिलन कार्यक्रमात दाता, लाभार्थी कुटुंबवैद्यकीय तज्ज्ञ आणि समाजातील अनेकांना एकत्र येण्याची अनोखी संधी मिळाली. स्टेम सेल दान केल्याने गरजू रुग्णाचा जीव वाचू शकतो हे सर्वांनी अनुभवले. इतरांनीही संभाव्य दाते म्हणून नोंदणी करावीअसा संदेश यातून दिला गेला. उपस्थितांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दाते म्हणून नोंदणी करावीअसा संदेश यातून दिला गेला.

हा भावनिक सोहळा कृतज्ञता आणि प्रेरणादायी क्षणांनी अविस्मरणीय ठरला. ‘‘दोन्ही मुलींच्या आजाराचे निदान झाल्यावर आमचे संपूर्ण जगच कोसळले होते. परंतु एका निःस्वार्थ कृतीमुळे आम्हांला आमच्या मुली पुन्हा मिळाल्या. आम्ही दात्याचे तसेच दात्री आणि सह्याद्रि हॉस्पिटलचे आयुष्यभर ऋणी राहू’’या शब्दांत जुळ्या मुलींच्या पालकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमानिमित्ताने दोन्ही मुली भेटल्याने संबंधित दात्यालाही भावना दाटून आल्या. ‘‘माझे दाता म्हणून नोंदणी करणे एवढ्या मोठ्या कार्याला कारणीभूत ठरेल ही मी कधीही कल्पना केली नव्हती. यामुळे एक नव्हे तर दोन्ही मुलींचे जीव वाचले. आज आराध्या आणि श्रृती हसतमुखनिरोगी दिसत आहेत. माझ्यासाठी हा क्षण आयुष्यातील सर्वात मोठा भावनिक क्षण आहे. ’’ या शब्दांत दात्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. 

सह्याद्रि हॉस्पिटलचे हेमॅटोलॉजी विभागाचे संचालक डॉ. शशिकांत आपटे म्हणाले, ‘‘ही कामगिरी केवळ वैद्यकीय यशाची नव्हे तर संपूर्ण समाजासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश आहे.’’ स्टेम सेल दानामुळे निराशेला नवा किरण मिळू शकतो. सह्याद्रि हॉस्पिटलचे, हेमॅटोलॉजिस्ट सल्लागार डॉ. कन्नन सुब्रमणियन म्हणाले, ‘‘एका दात्याकडून मिळालेले स्टेम सेल्स जुळ्या भावंडांसाठी पुरेसे ठरणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. या घटनेतून अवयवदानाची नोंदणी केंद्रे आणि रुग्णालये यांच्यातील सहकार्य किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होतेकारण याच कारणामुळे जीव वाचवणारे उपचार शक्य होतात.’’

मिस्टर इंडिया इंटरनॅशनल २०१७ आणि दात्री संस्थेचे ब्रँण्ड अम्बेसेडर श्री. दर्शनिंग खुराना यांनी उपस्थितांना प्रेरित करताना सांगितले की, ‘‘एका दात्यामुळे दोन तरुणांचे प्राण वाचले. स्टेम सेल दान हे केवळ औषधशास्त्र नाही तर मानवतेचे सर्वोत्तम रुप आहेहे यानिमित्ताने सर्वांना समजले.’’

या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो उपस्थितांनी स्टेम सेल दाता म्हणून नोंदणी करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमानिमित्ताने अधिकाधिक जागरुकतेची तातडीने गरज असल्याचे अधोरेखित झाले. प्रत्येक नोंदणीमुळे गरजू रुग्णाचे प्राण वाचवण्याची संधी मिळू शकतेहे उपस्थितांनी मनापासून जाणले.

दात्री संस्थेचे दक्षिण विभागाचे नॅशनल ऑपरेशन्स हेडश्री. अबी सॅम जॉन यांनी आपल्या दीर्घकालीन उद्दिष्टांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘स्थापनेपासून आजपर्यंत दात्रीने १,६४५ रक्त स्टेम दान आणले असून१८९७३ पेक्षा अधिक दात्यांची नोंदणी केली आहे. भारतातील अनुवांशिक फरकामुळे गरजू रुग्णाला योग्य दाता मिळणे हे अद्यापही मोठी अडचण आहे. प्रत्येक नवीन नोंदणीमुळे जीव वाचवणा-या योग्य जुळणीची वाट पाहणा-या कुटुंबांची आशा अधिकच दृढ होते.’’

दाता-अवयववापरकर्ता भेट हा कार्यक्रम केवळ जगण्याचे सेलिब्रेशन कार्यक्रम ठरला नाही. या कार्यक्रमानिमित्ताने अधिकाधिक रक्त-स्टेम सेल दाते उपलब्ध व्हावी ही आपत्कालीन गरज लोकांपर्यंत पोहोचवण्याचे व्यासपीठ ठरले. या भावनिक भेटीमुळे शेकडो उपस्थितांनी दाते म्हणून नोंदणी करण्याची शपथ घेतली. या नव्या नोंदणीमुळे प्रतीक्षायादीतील कुटुंबांसाठी आशेची किरण निर्माण होतातहे अधोरेखित झाले. हा कार्यक्रम केवळ वैद्यकीय विकासाचा टप्पा ठरला नाही तर सह्याद्रि रुग्णालयाच्या गुंतागुंतीच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्याच्या बांधिलकीचे तसेच समाजाला मोठ्या मानवतावादी ध्येयात सामील करुन घेण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक ठरले. दाता-अवयववापरकर्ता हा केवळ वैद्यकीय माहितीविषयीचा कार्यक्रम ठरला नाही. हा कार्यक्रम समाजाला एका दयाळू कृतीतून आशाआरोग्य आणि मानवतेची नवी लाट पसरु शकते ही चळवळ ठरली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading