Sunday, April 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आम्ही इतर मागास समाजाचे नाही तर आमचे स्वतःचे आरक्षण मागत आहोत – मनोज जरांगे पाटील

मुंबई: प्रतिनिधी

मराठा म्हणजेच कुणबी असल्याचे व्यवस्थित समजून घ्या. आम्ही इतर मागास समाजाचे आरक्षण मागत नाही तर आमचे स्वतःचे आरक्षण मागत आहोत, असा दावा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला.

ओबीसी समाजाचे आरक्षण काढून आम्हाला द्या, अशी आमची मागणी नाही. आम्ही आमचेच आरक्षण मागत आहोत. ओबीसी प्रवर्गातील 32 टक्यांपैकी 20 टक्के आरक्षण मराठ्यांना द्या, असे आमचे म्हणणे नाही. मराठा हाच कुणबी असल्याचे लक्षात घ्या, असेही ते म्हणाले.

महापालिका भवन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलकांच्या गर्दीमुळे चक्काजाम झाल्याचे कळताच जरांगे पाटील यांनी शिस्तीत आणि शांततेत पार पाडा, असे आवाहन आपल्या समर्थकांना केले.

आपली वाहने पोलिसांनी नेमून दिलेल्या जागेतच उभी करा. कॉटन ग्रीन, मस्जिद बंदर, शिवडीला वाहने उभी करा. पाऊस आला तर तुम्हाला आपल्या वाहनांमध्ये झोपता येईल. तिथून लोकलने काही मिनिटातच आंदोलन स्थळी पोहोचू शकाल. वेळ पडली तर वाशीला वाहने उभी करा. आपल्याला आंदोलन शिस्तीत आणि शांततेत पार पाडायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading