Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNE

शिवछत्रपतींचे भव्य दिव्य कार्य तेवढ्याच भव्य शिवसृष्टीच्या माध्यमातून समोर मांडण्याचा प्रयत्न – सुबोध भावे

 

पुणे : शिवसृष्टीत अतिशय सुंदर पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट साकारला आहे. या ठिकाणी महाराजांशी संबंधित महत्त्वाच्या घटना, गोष्टी, त्यांच्या पुत्राचे, सहकार्यांचे पराक्रम याद्वारे जणू शिवकाळ अवतरला असून शिवछत्रपतींचे भव्य दिव्य कार्य तेवढ्याच भव्य दिव्य पद्धतीने शिवसृष्टीच्या माध्यमातून नव्या पिढीसमोर येत असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी काढले. भावे यांनी नुकतीच सहपरिवार आंबेगाव बुद्रुक येथे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने निर्माणाधिन असलेल्या शिवसृष्टीला भेट दिली, तेव्हा ते बोलत होते. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त अमृत पुरंदरे, विनीत कुबेर, शिवसृष्टीचे प्रशासकीय अधिकारी अनिल पवार आणि कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते.

भव्य शिवसृष्टी उभारण्याची डॉ. बाबासाहेब पुरंदरे व त्यांच्या सहकाऱ्यांची तळमळ या प्रकल्पाने खऱ्या अर्थाने सफल केली असल्याचे सांगत भावे पुढे म्हणाले की, “शिवसृष्टी पाहून बाहेर जाताना प्रत्येक जण हा शिवछ्त्रपतींचे कर्तृत्त, विचार, संस्कार आणि स्मृती घेऊन जातात. छत्रपती शिवरायांची पूजा हे बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न होते, आज ते साकारताना पाहून आनंद होत आहे. असेही भावे म्हणाले.

मी लहान असल्यापासून पुरंदरे यांची महाराजांवरील व्याख्याने ऐकली आहेत, त्यांच्या पुस्तकांची पारायणे केली, जाणता राजाच्या अनेक प्रयोग पहिले आहेत. पण विश्वामध्ये महाराजांच्या नावाने त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा आढावा घेणारा अशी शिवसृष्टी उभी करावी ही त्यांची इच्छा होती. यामुळे येणाऱ्या पिढ्यांना महाराजांच्या कार्य कतृत्त्वाने प्रेरणा मिळेल हे पुरंदरे यांचे स्वप्न आता शिवसृष्टीच्या निमित्ताने पूर्ण होत असल्याचा आनंद यावेळी भावे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading