Monday, May 25, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘घरोघर जाऊन मतदार याद्या तपासा’ उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकांना आदेश

 

मुंबई: प्रतिनिधी

सध्या मोठ्या प्रमाणावर मतांची चोरी होत असल्यामुळे महापालिका निवडणुकीच्या काळात घरोघर जाऊन मतदार याद्या काटेकोरपणे तपासा, असे आदेश शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले आहेत.

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे सध्या नियमितपणे शिवसेनेच्या शाखांना भेटी देत आहेत. दहिसर येथील शाखा क्रमांक चारला दिलेल्या भेटीच्या वेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीबाबत सूचना केल्या.

आपल्या मतांची चोरी होत आहे. त्यामुळे घरोघरी जा. मतदार याद्या काळजीपूर्वक तपासून घ्या. हे काम तुम्हाला अत्यंत जबाबदारीने करावे लागणार आहे. डोळ्यात तेल घालून याद्या तपासा, असे ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मतचोरी या विषयावरून सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील मतांच्या चोरीची शक्यता आपण लोकसभा निवडणुकीपूर्वीच व्यक्त केली होती, असे सांगत मतचोरीच्या आरोपाला दुजोरा दिला आहे. त्याचीच री ओढत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading