Monday, November 2, 2026
Latest NewsPUNE

जन्माष्टमी उत्सव फॉरेस्ट काउंटी, खराडी येथे भक्तिभावाने साजरा

पुणे : खराडी येथील फॉरेस्ट काउंटीमध्ये भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. संध्याकाळची सुरुवात मनमोहक आगमन नृत्याने झाली, त्यानंतरचा मुख्य आकर्षण होता — दशावतार नाटिका. यात ३० कलाकार — लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत — भगवान विष्णूंच्या दहा अवतारांचे जिवंत दर्शन घडवले. देखणे पोशाख, आकर्षक वस्तू व २० मिनिटे प्रभावी कथनशैली यामुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. या नाटिकेने युगानुयुगे प्रभू कसे धर्माचे रक्षण करतात, याची आठवण करून दिली.

रासलीला नृत्य, सुरेल भजने आणि रोमांचक दहीहंडी यामुळे उत्सवाचा जल्लोष अधिकच वाढला. शेवटी सर्वांनी मिळून प्रेम व ऐक्याने महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी आनंद लुटला — ज्यामुळे हा उत्सव केवळ एक सण न राहता शिकण्याचा, एकत्र येण्याचा आणि भक्तीभाव अनुभवण्याचा एक दिव्य प्रवास ठरला.

Leave a Reply