Monday, May 25, 2026
Latest NewsPUNE

संविधानिक तत्वांचे पालन केले तर स्वातंत्र्य अबाधित राहील – विद्यार्थी महोत्सवातून संदेश


-पुण्यातील शंभराहून अधिक शाळांचा=सहभाग

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुण्यात सुवार्ता फाउंडेशनच्या वतीने भव्य विद्यार्थी महोत्सव 2025 उत्साहात पार पडला. “संविधानिक तत्वांचे पालन आणि विज्ञान-एकात्मतेच्या आधारेच देशाचे स्वातंत्र्य टिकून राहील,” असा ठाम संदेश या महोत्सवातून देण्यात आला. महोत्सवात चित्रकला, भाषण, गायन अशा विविध सांस्कृतिक स्पर्धांचे शहर पातळीवर आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण प्रदूषण, संविधानिक हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या विषयांवर विद्यार्थ्यांनी सादरीकरणे केली. पुणे शहरातील शंभराहून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात जोशात सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार मोहन जोशी, आर जे संग्राम,हुलगेश चलवादी, सुरेंद्र पठारे, हाजी झुबेर मेमन, सुधाकर सदाफळ, फेबियाणं सॅमसन, सत्यवान गायकवाड, असुंता पारगे, निलम पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. संदीप बर्वे व शरद केदारी यांना पुरस्कार देण्यात आले.राहुल डंबाळे यांनी शुभेच्छा दिल्या.
गायन स्पर्धेत सेंट जोसेफ शाळेला पहिला क्रमांक मिळाला, भाषण स्पर्धेत मनस्वी शिंदे हिला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले, या व्यतिरिक्त गटा प्रमाणे पारितोषिके मिळाली.
यावेळी सुवार्ता फाउंडेशनचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते लुकस केदारी उपस्थित होते. 

लुकस केदारी यांनी प्रस्ताविक भाषणात स्वातंत्र्य टिकवण्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांचे स्मरण करून दिले.
ते म्हणाले, “हे स्वातंत्र्य अनेक शूरवीरांच्या बलिदानामुळे मिळाले आहे. आता ते टिकवणे ही आपली जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञान, एकात्मता, सामंजस्य व संविधानिक मूल्ये आपल्या जीवनात रुजवली पाहिजेत. प्रदूषण कमी करणे,पर्यावरण संवर्धन, अभ्यासाला प्राधान्य देणे, मोबाईलचा अतिरेकी वापर टाळणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवणे हीच खरी देशसेवा आहे.”

आरजे संग्राम यांनी आपल्या भाषणात पर्यावरण संवर्धन, एकात्मता, वाहतूक कोंडी, पाण्याची कमतरता या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी जागरूक नागरिक म्हणून योगदान देण्याची गरज अधोरेखित केली. देशाचे स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर प्रत्येकाने सामूहिकपणे कार्य केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
आप चे समन्वयक अमित म्हस्के यांनी १५ ऑगस्ट सर्व बांधवाणी देशाचा सण म्हणून साजरा केला पाहिजे असे सांगितले.

सुवार्ता फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी सेक्रेटरी प्रतिमा केदारी, डॉ.रुपाली संभूस,शितल गायकवाड, महिला कार्यकर्त्या शरयू परब, रीना अरु, किशोर कांबळे, अंटन कदम हजर होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading