Wednesday, September 16, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

15 ऑगस्ट रोजी चिकन आणि मटण विक्रीवर बंदी घालण्याच्या निर्णयावर खाटीक समाज संतप्त

कल्याण: प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी चिकन आणि मटण विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महापालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे खाटीक समाज संतप्त आहे.

उद्यापर्यंत हा निर्णय मागे न घेतल्यास स्वातंत्र्यदिनी महापालिका भवनासमोर कोंबड्या व बकऱ्या घेऊन उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

कृष्ण जन्माष्टमी, जैन धर्मीयांचे पर्युषण पर्व यामुळे 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश छत्रपती संभाजी नगर महापालिकेने दिला आहे. नागपूर महापालिकेने देखील 15 ऑगस्ट रोजी चिकन, मटण विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading