वी ने फॅमिली पोस्टपेड योजनेतील रेडेक्स लाभ विस्तारले: आता संपूर्ण कुटुंब घेऊ शकेल इंटरनॅशनल रोमिंगचा आनंद
या प्लॅन मध्ये ट्रॅव्हल लाउंज अॅक्सेस, इंटरनॅशनल रोमिंग आणि नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, जिओ हॉटस्टार, स्वीगी वन आणि अशा इतर अनेक गोष्टींचे सबस्क्रीब्शन समाविष्ट
भारतातील आघाडीचा टेलिकॉम ऑपरेटर वी (वोडाफोन आयडिया) ने आपल्या रेडेक्स पोस्टपेड प्लॅनच्या यशावर आधारित नवीन रेडेक्स फॅमिली प्लॅनची घोषणा केली आहे. अमर्याद 4G आणि 5G डेटा, इंटरनॅशनल रोमिंग आणि विविध प्रीमियम ट्रॅव्हल, लाईफस्टाईल आणि मनोरंजन सुविधांसह असलेला हा भारतातील एकमेव फॅमिली पोस्टपेड प्लॅन आहे.
या उद्योग क्षेत्रात पोस्टपेड विभागामध्ये अग्रणी म्हणून वी ने नेहमीच ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य दिले आहे. मर्यादित डेटा किंवा फॅमिली प्लॅन मधील सेकंडरी मेंबर्ससाठी सीमित फायदे देण्याच्या या क्षेत्रातील प्रचलित गोष्टींपासून स्वतःला वेगळं करत रेडेक्स फॅमिलीच्या सादरीकरणासह वी पोस्टपेडचा अनुभव नव्याने परिभाषित करत आहे. वी आता संपूर्ण कुटुंबासाठी समान लाभ देत आहे.
डेटा फ्रीडम, डिजिटल समावेश आणि संपूर्ण मूल्य यांमध्ये एक नवा मापदंड प्रस्थापित करत, रेडेक्स फॅमिली प्लॅन हा पहिला असा प्लॅन आहे ज्यात सेकंडरी मेंबर्सना प्रायमरी मेंबरप्रमाणेच डेटा बेनिफिट्स मिळतात. याचा अर्थ असा की वी रेडेक्स फॅमिली प्लॅनचे प्रायमरी आणि सेकंडरी सदस्य — दोघांनाही अमर्याद डेटा आणि प्रीमियम सुविधांचा संपूर्ण लाभ मिळेल.
रेडेक्स फॅमिली प्लॅनसह, वी भारतातील पोस्टपेड प्लॅन्ससाठी एक नवीन मापदंड प्रस्थापित करत आहे. देशातील सर्वात मोठ्या पोस्टपेड ग्राहक गटांपैकी एक असलेला ब्रँड म्हणून, वी ला पोस्टपेड ग्राहकांच्या गरजांचे सखोल आकलन आहे. दोन सदस्यांसाठी केवळ 1601 रु. / महिन्याला उपलब्ध असलेला रेडेक्स फॅमिली प्लॅन हा आजचा सर्वात आकर्षक फॅमिली पोस्टपेड प्लॅन आहे. हा एकमेव प्लॅन संपूर्ण डेटा स्वातंत्र्य, उच्च दर्जाचं मनोरंजन आणि खास प्रवास व जीवनशैलीचे लाभ एकत्रितपणे देतो. त्यायोगे तो भारतातील सर्वात फायदेशीर पोस्टपेड फॅमिली प्लॅन बनत आहे.
या प्लॅनमध्ये सर्व कुटुंबीयांना अमर्याद डेटा, इंटरनॅशनल रोमिंग लाभ आणि अत्यंत लोकप्रिय प्रीमियम सेवांमध्ये समान प्रवेश मिळतो. यातून पोस्टपेडचा खरोखर उंचावलेला प्रीमियम अनुभव दिला जातो. आजच्या परस्परसंलग्न कुटुंबांसाठी डिझाइन केलेला हा आगळावेगळा प्लॅन पोस्टपेड श्रेणी पुन्हा परिभाषित करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
प्लॅनचे लाभ:
- टेल्को लाभ: प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही सदस्यांना अमर्याद 5G/4G डेटा, अमर्याद व्हॉइस कॉल्स आणि दर महिन्याला 3,000 SMS यांचा लाभ घेता येणार. या प्लॅन मध्ये आणखी सदस्य सहभागी करून घ्यायचे असतील तर प्रति सदस्य 299 रु. भरून त्यांना देखील हेच लाभ मिळतील.
- मनोरंजन लाभ: नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, जिओ हॉटस्टार आणि सोनी LIV यांसारख्या भारतातील आघाडीच्या OTT प्लॅटफॉर्म्ससह मनोरंजनाची मेजवानी
- प्रवास आणि लाईफस्टाईल लाभ: ग्राहक 6 महिन्यांची Swiggy One सदस्यता, वर्षातून 4 फ्री एअरपोर्ट लाउंज अॅक्सेस आणि दरवर्षी 2999 रु. किमतीचा 7-दिवसांचा फ्री इंटरनॅशनल रोमिंग (IR) पॅक मिळवू शकणार. याशिवाय दुसऱ्या IR पॅकवर दोघांपैकी कुणीही वापरू शकेल असा 750 रु. ची वार्षिक 25% सूट.
- डिव्हाइस सुरक्षा लाभ: या प्लॅन मध्ये एक वर्षाचे Norton डिव्हाइस सिक्युरिटी प्रोटेक्शन समाविष्ट आहे.
- Vi Priority: Vi Priority सेवेद्वारे रेडेक्स ग्राहक 24×7 खास ग्राहक सेवा, स्टोअरमध्ये प्राधान्य, आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच SIM डिलिव्हरीचा लाभ या सुविधा मिळणार आहेत.
रेडेक्स फॅमिली प्लॅनच्या सादरीकरणातून वी ग्राहकांना सर्वाधिक लाभ देणारे प्रिमियम, उच्च मूल्य पर्याय सादर करण्याची आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करत आहे.
