Monday, May 25, 2026
BusinessLatest News

गोदरेज प्रॉपर्टीजचा वडोदऱ्यात प्रवेश

 

मुंबईस्थित विकासकाने प्लॉट विकासासाठी सुमारे 34 एकर जमीन संपादित केली आहेज्याचे विक्रीयोग्य क्षेत्रफळ अंदाजे लाख चौरस फूट आहे

भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने (GPL), (BSE स्क्रिप आयडी: GODREJPROP) आज सुमारे 34 एकर जमिनीच्या संपादनासह वडोदऱ्यात प्रवेशाची घोषणा केली. या जमिनीवर प्रामुख्याने प्रीमियम प्लॉटेड निवासी युनिट्स असतील आणि सुमारे 9 लाख चौरस फूट क्षेत्र विक्रीयोग्य असेल. गेल्या वर्षभरात GPL ने गुजरातमध्ये केलेले हे दुसरे भूसंपादन आहेज्यामुळे राज्यात त्यांचे स्थान अधिक भक्कम झाले आहे. यापूर्वीऑक्टोबर 2024 मध्येकंपनीने वस्त्रापूरअहमदाबाद येथे सुमारे ३ एकर जमीन संपादित केली होती.

 

अजवा रोडवर असलेली जमीन म्हणजे एक वेगाने वाढणारा रिअल इस्टेट कॉरिडॉर आहे. येथे अनेक व्हिला आणि प्लॉटचा विकास झालेला दिसतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजेही जागा वडोदऱ्यातील महत्त्वाच्या ठिकाणांशी जोडलेली आहे. तसेच येथील पायाभूत सुविधांचे जाळे देखील मजबूत आहे. प्रमुख व्यावसायिक केंद्रे तसेच शहरातील अन्य महत्त्वाच्या ठिकाणांशी याची उत्तम कनेक्टिव्हिटी आहे. विशेष म्हणजेशिक्षणासाठी प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आणि वेळ घालवण्यासाठी मनोरंजनाची ठिकाणे येथून जवळच आहेत. वडोदरा विमानतळापासून जवळ असल्याने राहण्यासाठी ही अत्यंत योग्य जागा ठरणार आहे. 

 

गोदरेज प्रॉपर्टीजचे एमडी आणि सीईओ गौरव पांडे म्हणाले, “वडोदरा या उत्साहाने सळसळत्या शहरात प्रवेश करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. एक उद्योजक म्हणून राज्याप्रती असलेली आमची वचनबद्धता आणि मार्केटच्या क्षमतेवरील विश्वास अधिक दृढ करण्यासाठी हे संपादन महत्त्वपूर्ण आहे. प्लॉट विकासाद्वारे वाढीची उत्तम क्षमता असलेल्या शहरांमध्ये प्रवेश करण्याच्या आमच्या लक्ष्याशी हे संपादन धोरणात्मकरित्या जोडलेले आहे. प्लॉटवरील घरांना लक्षणीय प्रतिसाद मिळत असल्याने अजवा रोड हे विस्तारासाठी अत्यंत योग्य ठिकाण आहे. वडोदरा शहराच्या प्रचंड वाढीच्या क्षमतेचा फायदा घेत रहिवाशांना दीर्घकालीन फायदे मिळतील असा एक शाश्वत आणि समृद्ध समुदाय निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading