Wednesday, May 20, 2026
BusinessLatest News

या पावसाळ्यात एसबीआय जनरलच्या मोटार इन्शुरन्ससह चिंतामुक्त प्रवास करा

उन्हाळ्यामुळे त्रासलेल्या साऱ्यांनाच पावसाच्या सरींमुळे मोठा दिलासा मिळतो. यासोबतच वाहन मालकांसाठी अनेक आव्हानेही निर्माण होतात. रस्त्यांवर साचलेले पाणी, अनपेक्षित पूर, निसरडे रस्ते आणि कमी दृश्यमानता यामुळे वाहन चालवण्याचे धोके मोठ्या प्रमाणात वाढतात. पावसाळ्याशी संबंधित या सगळ्या चिंतांचे एसबीआय जनरल इन्शुरन्सला जाणीव आहे आणि त्यामुळेच ते वाहन मालकांना सक्रियपणे योग्य मोटार विमा संरक्षण घेण्याचे आवाहन करतात. एक सर्वसमावेशक मोटार विमा पॉलिसी तुमच्या वाहनाच्या संभाव्य नुकसान होण्यापासून संरक्षण करतेच, शिवाय पावसाळ्यात भिजलेल्या रस्त्यांवर शांततेने आणि सुरक्षित प्रवास करण्याचा आत्मविश्वास देखील देते.

या पावसाळ्यात रस्त्यावर तुम्हाला सुरक्षित आणि चिंतामुक्त ठेवण्यासाठी, तुमचे वाहन सुरक्षित राहावे यासाठी एसबीआय जनरल इन्शुरन्स खालील शिफारसी करत ​​आहेत.

  • पाण्यामुळे इंजिनाला होणाऱ्या नुकसानापासून व्यापक कव्हरेज

तुमच्या मोटार विम्यामध्ये पाण्याशी संबंधित नुकसान उदा. पूर येणे, पाणी साचणे किंवा वाहन पार्क करताना इंजिनमध्ये अडचण येणे यासारखे सर्वसमावेशक विमा संरक्षण समाविष्ट आहे याची खात्री करा. पावसामुळे जेव्हा तुमच्या वाहनाच्या इलेक्ट्रिकल तसेच महत्त्वाच्या भागांवर परिणाम होतो तेव्हा या समस्या उद्भवतात. वेळेवर तयारी केल्याने भविष्यात मोठ्या संकटांना आळा घालण्यास मदत होऊ शकते. तसेच, पावसामुळे इंजिनाला कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून आम्ही पाणी साचलेल्या ठिकाणी वाहन चालवणे टाळण्याची शिफारस करतो.

जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक वाहन (EV) असेल, तर बॅटरी कव्हरसाठी “अ‍ॅड-ऑन” किंवा “रायडर” फीचर खरेदी करण्याचा विचार करा, कारण बहुतेक विमा पॉलिसींमध्ये बॅटरी कव्हरचा समावेश नसतो. ही फीचर्स अतिरिक्त खर्चासाठी पॉलिसीचे कव्हर वाढवू शकतात.

  • वाहनाची नियमित देखभाल

पावसाळा तुमच्या वाहनासाठी अडचणींचा ठरू शकतो, मात्र, या हंगामात थोडी जास्त काळजी घेतल्यास प्रवास सुरळीत होतो. तुमचे ब्रेक, टायर, वायपर आणि एक्झॉस्ट सिस्टम नियमित तपासल्यास तुम्हाला खडबडीत रस्त्यांवरही सुरक्षित राहण्यास मदत होऊ शकते. वायपर साफसफाई नियमित करा, तसेच यासाठी पाण्याची उपलब्धता तपासत राहा जेणेकरून दृश्यमानता प्रभावित होणार नाही. चांगली देखभाल केलेले वाहन केवळ सुरक्षित नसते तर त्यामुळे तुम्हाला अशा टाळता येण्याजोग्या समस्यांसाठी विमा दावे टाळण्यास देखील मदत होऊ शकते.

  • धोकादायक परिस्थितीसाठी खबरदारी

सावधगिरी बाळगणे यासारखी दुसरी खबरदारी नाही. अगदी सर्वोत्तम विमा देखील त्याची जागा घेऊ शकत नाही. तुमच्या वाहनाला गंभीर नुकसान होऊ नये म्हणून पाण्याने भरलेल्या रस्त्यावर जाणे टाळा. प्रत्येकवेळी गाडी चालवण्यापूर्वी, तुमचे दिवे, ब्रेक आणि टायर योग्य स्थितीत असल्याची खात्री करा. विमा असो वा नसो, तुमची आणि इतरांची सुरक्षितता सर्वात महत्त्वाची आहे, हे लक्षात ठेवा.

एसबीआय जनरल इन्शुरन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदयन जोशी म्हणाले, “वाहनांसाठी पावसाळा आव्हानात्मक असू शकतो, परंतु योग्य कव्हरेज तसेच काही सावधगिरी घेतल्यास, सुरक्षित राहणे आणि काळजी न करता पावसाळ्याचा आनंद घेणे शक्य आहे. आम्ही सर्व वाहन मालकांना त्यांच्या विम्याचा आढावा घेण्याचे आणि पाण्यामुळे होणारे नुकसान लक्षात घेता पावसाळ्यातील विशिष्ट जोखीम हाताळण्यासाठी तो तयार आहे याची खात्री करण्याचे आवाहन करतो.”

प्रत्येक व्यक्तीच्या आणि व्यवसायाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विमा उपायांची विस्तृत श्रेणी एसबीआय जनरल इन्शुरन्स देते. यात सर्वसमावेशक मोटर विमा आणि तृतीय-पक्ष दायित्व कव्हरपासून ते इंजिन संरक्षण, शून्य घसारा आणि तत्काळ सहाय्य यासारख्या अतिरिक्त योजनांपर्यंतचा समावेश आहे. विशेषतः जेव्हा अत्यंत संकटाचा काळ असतो तेव्हा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यास मदत करण्यासाठी आम्ही योजना तयार केल्या आहेत. मनःशांती देणारा व्यावहारिक, ग्राहक-केंद्रित विमा ऑफर करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading